Nita Ambani : मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी आज एक मोठे व्यक्तिमत्व आहे. नीता अंबानी यांनी 1985 मध्ये मुकेश अंबानी यांच्यासोबत विवाह केला होता. आज त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षिका म्हणून केली होती. मुकेश अंबानी यांच्याशी लग्नानंतरही त्यांनी काम सोडले नव्हते.प्ले
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा नुकताच जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडला होता. त्यामुळे अंबानी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या तीनही मुलांच्या लग्नात कसलीच कसर सोडत नाही. आपल्या मुलांसाठी त्यांनी सर्वोतोपरी करण्याचा प्रयत्न असतो.
एका जुन्या मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितले होते की, त्यांनी एका अब्जाधीश उद्योगपतीशी लग्न केल्यानंतरही शिक्षिकेची नोकरी सोडली नव्हती.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी जेव्हा सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये आले होते जिथे दोघांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक मोठे खुलासे केले होते. नीता अंबानी यांनी सांगितले होते की, त्यांना त्यांच्या कामाबद्दल खूप उत्कटता होती. लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर त्यांनी सनफ्लॉवर नर्सरीमध्ये शिकवायला सुरुवात केली जिथे त्या आधीच नोकरी करत होत्या.
लग्नाआधीच नीता अंबानी यांनी मुकेश अंबानी यांच्यासमोर एक अट ठेवली होती की, त्या शिक्षिकेची नोकरी सोडणार नाहीत. अंबानी कुटुंबाला त्यांच्या नोकरीची कोणतीही अडचण नव्हती. यानंतर दोघांचे लग्न झाले. 1985 मध्ये मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांचा विवाह पार पडला. पण त्यानंतर ही त्यांनी आपली नोकरी कायम ठेवली. त्यावेळी त्यांना दरमहा 800 रुपये पगार मिळत होता. त्यांना मुलांना शिकवताना आनंद मिळत होता. त्यामुळे त्यांनी आपली नोकरी सुरुच ठेवली.
मुकेश अंबानी यांनी त्यावेळी गंमतीने सांगितले की, ‘तो संपूर्ण पगार माझा होता. आमच्या सर्व जेवणाचे बिल तीच देत असे. नीता अंबानी यांनी नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे.