मुंबई : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे आता सोपे झाले आहे. बाजाराचे आकलन आणि मुलभूत गुंतवणूक कौशल्यांसह सर्वसामान्य व्यक्ती दमदार रिटर्न प्राप्त करू शकते. फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत अधिक परतावा देणाऱ्या फ्लेक्सी कॅप फंडविषयी जाणून घेणं महत्वाचं आहे. म्युच्युअल फंडच्या फ्लेक्सी कॅप फंडच्या 10 टॉप योजनांद्वारे मागील एका वर्षात 37 ते 50 टक्के रिटर्न प्राप्त झाले आहेत. (What is a Flexi Cap fund Is Flexi Cap fund good for investment)
शेअर बाजार व म्युच्युअल फंडच्या व्यवहारांत सहभागी होणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेअर बाजारात तेजी दरम्यान फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. भारतीय म्युच्युअल फंड कंपन्यांचे संघटन असलेल्या अँम्फीने (AMFI- Association of Mutual Funds in India) अलीकडील आकडेवारी जारी केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये इक्विटी संबंधित योजनांमध्ये गुंतवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली गेली आहे. विशेष म्हणजे या श्रेणीत फ्लेक्सी कॅप फंड मध्ये गुंतवणुकीच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात जून ते नोव्हेंबर दरम्यान फ्लेक्सी कॅप फंड्स (Flexi cap mutual fund) मध्ये 23, 127 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा टप्पा पार झाला आहे.
यंदाच्या वर्षी बाजारात तीन नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये ICICI प्रू फ्लेक्सी कॅप फंड, महिंद्रा मॅनलाईफ फ्लेक्सी कॅप स्कीम आणि निप्पॉन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड समाविष्ट आहे. दरम्यान, म्युच्युअल उद्योगांत फ्लेक्सी कॅप श्रेणी नुकतीच दाखल झाली आहे.
अधिक प्रमाणात मिळणाऱ्या रिटर्नमुळे गुंतवणूकदारांचा ओढा फ्लेक्सी फंडाकडे सर्वाधिक आहे. फ्लेक्सी कॅप स्कीमच्या नुसार फंड मॅनेजर 65 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. उर्वरित रक्कम अन्य मार्केटमध्ये गुंतविली जाते. फ्लेक्सी कॅप फंडाची रक्कम सर्व श्रेणीच्या मार्केट कॅप कंपनीत गुंतवणूक केली जाऊ शकते. फंड मॅनेजर स्ट्रॅटेजीनुसार लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते.
फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणुकीची श्रेणी विस्तृत आहे. यामध्ये गुंतवणुकीवर जोखीम व रिटर्न यांचे योग्य संतुलन राखले जाते. स्टॉक मार्केटच्या घसरणीतही फ्लेक्सी कॅप फंड रिटर्न प्राप्त करतात. गुंतवणूकदार विविध श्रेणीत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी मल्टिकॅप फंड सर्वोत्तम मानला जातो.
बाजाराच्या स्थितीच्या अनुसार गुंतवणुकीसाठी फ्लेक्सी कॅप फंड सर्वोत्तम पर्याय मानला जातो. फ्लेक्सी कॅप स्कीममध्ये फंड मॅनेजर बाजारातील स्थितीनुसार विविध कॅपच्या श्रेणीत गुंतवणूक करतो. त्यामुळे अशाप्रकारच्या योजनांतून सर्वोत्तम रिटर्न प्राप्त होतात.
इतर बातम्या
ईपीएफओकडून 23.44 कोटी खात्यांवर व्याज जमा; ‘असे’ चेक करा आपले बॅलन्स
एफडी ही फायद्याची, जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल सर्वोत्तम परतावा
Special Report | 2 महिने पोलिसांना गुंगारा देणारा अनोखा ‘आरसा’
(What is a Flexi Cap fund Is Flexi Cap fund good for investment)