आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या उद्योग साम्राज्याबद्दल तुम्हाला माहितच आहे. कपडा, पेट्रोल, मोबाईल, रिटेल यासह वेगवेगळ्या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजने व्यवसाय विस्तार केला आहे. पण तुम्हाला हे माहितीय का? मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादकही आहेत. जामनगरच्या रिलायनस् रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी धीरूभाई अंबानी लाखीबाग आमराई बनवली आहे. ही आमराई जवळपास 600 एकरमध्ये पसरलेली आहे. इथे पिकणाऱ्या बहुतांश आंबा एक्सपोर्ट होतो. पण तुम्हाला माहितीय का? इथे तयार होणाऱ्या आंब्याशी जोडलेली एक खास परंपरा आहे. ‘आम मनोरथ’. संपूर्ण अंबानी कुटुंब ‘आम मनोरथ’च्या परंपरेच मोठ्या उत्साहाने पालन करतं. याचा संबंध भगवान श्रीकृष्णाच्या श्रीनाथ जी रुपाशी आहे. या सगळ्या पंरपरेबद्दल जाणून घ्या.
मुकेश अंबानी आणि त्यांच कुटुंब धार्मिक आहे, हे सर्वांनाच माहित आहे. ते राजस्थान स्थित श्रीनाथ जीं चे भक्त सुद्धा आहेत. मुकेश अंबानी नेहमीच कुटुंबासह श्रीनाथ जीं ची पूजा-अर्चना करतात. याच मंदिराशी संबंधित एक परंपरा अंबानी कुटुंब एंटीलियामध्येही साजरी करत आलय.
काय आहे ‘आम मनोरथ’ उत्सव?
मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया येथील घरात एक मोठ श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी अंबानी कुटुंब ‘आम मनोरथ’ उत्सव साजरं करतं. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचं ‘आम मनोरथ’च्या तयारीवर बारीक लक्ष असतं. ‘आम मनोरथ’ उत्सवात भगवान श्रीकृष्णाच्या श्रीनाथजी स्वरूपाला आंब्याच्या पहिल्या पिकाचा नैवेद्य दाखवला जातो. एंटीलियातील मंदिर आंब्याने सजवलं जातं. आंब्याचे झूमर बनवले जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्सवासाठी आंबे रिलायन्सच्या जामनगरच्या बागेतूनच आणले जातात.