Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांचा दे धक्का! या कंपनीचे बदलले नाव, गुंतवणूकदारांचा फायदा काय

| Updated on: Jul 30, 2023 | 10:22 AM

Gautam Adani : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी अचानकच सर्वांना धक्का दिला. या कंपनीचे नाव बदलले. यावर्षात अदानी समूहात सातत्याने उलथापालथ सुरु आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर कंपनी पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे.

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांचा दे धक्का! या कंपनीचे बदलले नाव, गुंतवणूकदारांचा फायदा काय
Follow us on

नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी अनेकांना धक्का दिला. अचानक कंपनीचे नाव बदलले. हिंडनबर्ग अहवालानंतर कंपनीत उलथापालथ सुरु आहे. यावर्षीच्या सुरुवातीला 23 जानेवारी रोजी अदानी समूहावर (Adani Group) रिपोर्ट बॉम्ब पडला होता. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर धडाधड घसरले. या धक्क्यातून अजूनही कंपनी सावरलेली नाही. अनेक गुंतवणूकदारांनी त्यांचे शेअर विक्रीचे सत्र आरंभिले होते. कंपनीने त्यानंतर अनेक बदल केले. बरीच देणी, कर्ज फेडली. त्यासाठी कंपन्यांचे शेअर्स विक्री केले. या दरम्यान नवीन कंपनी पण स्थापन झाल्या. आता कंपनीने एका कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.

कंपनीचे नाव बदलले

गौतम अदानी यांनी कंपनीचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला. Adani Transmission Ltd चे नाव बदलण्यात आले. या कंपनीचे नाव Adani Energy Solution Ltd असे करण्यात आले. BSE ला याविषयीची सूचना कंपनीने दिली आहे. 27 जुलै, 2023 रोजी कंपनीने याविषयीची माहिती बाजार नियंत्रकाला दिली. नाव बदलण्यामागील कारणं समोर आली नाही. मात्र व्यवसाय विस्तारासाठी हा प्रयत्न असू शकतो. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

14 राज्यात कार्यरत

Adani Energy Solution Ltd कंपनीच्या नावात बदल झाल्यानंतर ही माहिती देण्यात आली. याविषयीचे सर्व सोपास्कार पार पाडण्यात आले. या नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे. ही कंपनी सध्या 14 राज्यात कार्यरत आहे. ही देशातील सर्वात मोठी खासगी वितरण कंपनी आहे.

ही कंपनी ताब्यात घेण्याच्या हालचाली

कोळशापासून वीज निर्मितीसाठी अनिल अंबानी यांनी कंपनी सुरु केली होती. ही कंपनी ताब्यात घेण्याच्या हालचाली अदानी समूह करत आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड असे कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मध्य भारतात 600 मेगावॅट वीज निर्मिती करते. हा प्लँट ताब्यात घेण्यासाठी गौतम अदानी हे निधी जमवत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासाठी 2.8 अब्ज डॉलर निधी जमावण्याची तयारी करण्यात येत आहे. अर्थात त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते. इतर पण अनेक समूह हा प्लँट खरेदीसाठी इच्छुक असल्याचे समोर येत आहे.

हायड्रोजन प्लँटसाठी निधीची जमवाजमव

अदानी एंटरप्राईजची उपकंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीजने हरीत इंधनावर आतापासूनच काम सुरु केले आहे. भविष्यात पर्यावरण पुरक इंधनाची मागणी वाढणार आहे. इलेक्ट्रिक कारसह इतर पर्यायावर काम सुरु आहे. त्यात अदानी न्यू इंडस्ट्रीजने आगेकूच केली आहे. हरित हायड्रोजन प्रकल्पासाठी निधी जमविण्यासाठी कंपनीने हालचाल केली. बार्कलेज पीएलसी आणि जर्मनीच्या डॉएच बँकेकडून कंपनीने 39.4 कोटी डॉलर जमावल्याची माहिती समोर येत आहे.