जीएसटी वाढवण्याचा प्रस्ताव, आज होऊ शकतो निर्णय; … तर या वस्तू महागणार

| Updated on: Nov 27, 2021 | 6:45 AM

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा  एकदा केंद्र सरकार विविध वस्तुंवरील जीएसटी (GST) वाढवण्याच्या विचारात आहे.

जीएसटी वाढवण्याचा प्रस्ताव, आज होऊ शकतो निर्णय; ... तर या वस्तू महागणार
जीएसटी
Follow us on

नवी दिल्ली: वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा  एकदा केंद्र सरकार विविध वस्तुंवरील जीएसटी (GST) वाढवण्याच्या विचारात आहे. जीएसटी वाढवण्यात यावी की नाही यासाठी जीएसटी परिषदेकडून (GST Council) मंत्र्यांच्या एका समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे.

जीएसटी वाढवण्याचा प्रस्ताव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जीएसटी परिषदेकडून वस्तू आणि सेवाकर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार एखाद्या वस्तुंवर जर 5 टक्के कर असेल तर तो वाढवून 7  टक्के करण्यात येणार आहे.  तसेच सध्या ज्या वस्तुंवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो तो वाढवून 20 टक्के करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  जीएसटीच्या स्लॅबमधये बदल करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. हा निर्णय मंजुरीसाठी जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत मांडण्यात येईल. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोने चांदी महागणार?

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोने-चांदीवरील जीएसटी वाढवण्याचा विचार आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतो. जीएसटी वाढल्यास सोने चांदी आणखी महाग होईल. यासोबतच रेडीमेड कपडे, चप्पल यासह विविध वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्यामालावर जादा जीएसटी आकारण्याचा विचार सुरू आहे. एककीडे पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आले. मात्र आता दुसरीकडे त्याची भरपाई वस्तू आणि सेवा कर वाढवू करण्यात येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या 

दिल्लीनंतर मुंबईतही जीवघेणं प्रदूषण, मुंबईकरांचं आयुष्य नेमकं किती वर्षांनी घटणार? नव्या सर्व्हेत खुलासा

‘त्या’ कोंबड्यांसाठीच सरकार बनवण्याचं भाकीत, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार

ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!