रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धाचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या (Russia Ukraine war) किमतीवर सातत्याने होताना दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा कच्चे तेल स्वस्त झाले. तीन आठवड्यापूर्वी कच्चे तेल चौदा वर्षांच्या उच्च स्थरावर म्हणजेच 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा घसरण झाली असून. आज कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरूच आहे. मात्र भारतात गेल्या चार नोव्हेंबरपासून इंधनाच्या दरात कोणतीही भाव वाढ करण्यात आलेली नाही. याचा सर्वात मोठा फटका हा किरकोळ इंधन विक्रेत्यांना बसत आहे. ठोक इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या दरात चाळीस टक्के वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र किरकोळ पेट्रोल विक्री दरात कोणताही बदल करण्यात न आल्याने याचा दबाव हा किरकोळ विक्रेत्यांवर असून, त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. सर्वात जास्त फटका हा नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या खासगी किरकोळ विक्रेत्या कंपन्यांना बसला आहे.
ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.
चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल डिझेलवरील सरचार्ज कमी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतात पेट्रोल प्रति लिटर मागे पाच रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर मागे दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हा कच्च्या तेलाचे भाव देखील कमी होते. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा दबाव हा पेट्रोलियम कंपन्यावर आल्याचे दिसून येत आहे.
Petrol-Diesel Price : कच्चा तेलालाच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनाचे दर
Gold, silver prices : सोन्याच्या दरात प्रति तोळा चार हजारांची घसरण; गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
Bank of Baroda देतीये स्वस्तात घर खरेदीची संधी; 24 मार्चला बँकेकडून गहान संपत्तीचा लिलाव