नवी दिल्ली – देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात घाऊक माहागाई तब्बल 12.54 टक्क्यांनी वाढल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये हेच प्रमाण 10.66 टक्के इतके होते. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये महागाई उच्चस्थरावर पोहोचली आहे. झपाट्याने होत असलेल्या इंधन आणि विजेच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. कच्च्या मालाच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे वस्तूंच्या एमआरपी दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय उत्पादकांकडून घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका सध्या ग्राहकांना बसत असल्याचे दिसून येते.
घाऊक बाजारात महागाई वाढल्याने त्याचा परिणाम किरकोळ विक्री बाजारपेठेवर देखील झाला आहे. किरकोळ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या वस्तुंच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. सरकारने महागाईबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सप्टेंबर महिन्यात महागाई 10.66 टक्क्यांनी वाढली होती. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ती 12.54 टक्क्यांवर पोहोचली आहे, याचाच अर्थ असा की गेल्या एका महिन्यामध्ये घाऊक महागाईत तब्बल 1.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे या महिन्यात अन्न, धान्यांसोबतच भाजीपाल्याचे रेट देखील वाढले आहेत.
दरम्यान याबाबत बोलताना अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, महागाई कमी होणार की वाढणार हे पूर्णपणे इंधनाच्या किमतीवर अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. विजेचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. सोबतच एलपीजी गॅसच्या किमती देखील गगणाला भिडल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. दरम्यान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले. इंधन स्वस्त झाले नसते तर या महिन्यामध्ये महागाई आणखी वाढली असती.आता इंधन स्वस्त झाल्याने पुढील महिन्यात कदाचीत काही प्रमाणात महागाई कमी होऊन, सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
संबंधित बातम्या
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आठवडाभर दिवसातून सहा तास बंद राहणार रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
किड्स पॅन कार्ड कसे काढावे? काय आहेत त्याचे फायदे; जाणून घ्या