LPG सिलिंडरच्या अनुदानाचे पैसे का मिळत नाहीत?, कंपनीनं दिली महत्त्वाची माहिती

| Updated on: Sep 02, 2021 | 3:30 PM

आता एलपीजी अनुदानावर एमओपीएनजी ई-सेवेकडून अधिकृत निवेदन आलेय. एमओपीएनजी ई-सेवा हे गॅस आणि तेल क्षेत्राशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. एलपीजीच्या सबसिडीची माहिती एका ट्विटद्वारे देण्यात आलीय.

LPG सिलिंडरच्या अनुदानाचे पैसे का मिळत नाहीत?, कंपनीनं दिली महत्त्वाची माहिती
Lpg Gas Cylinder Booking
Follow us on

नवी दिल्लीः सप्टेंबर महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती (LPG Price) वाढल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झाली. एलपीजीच्या वाढत्या किमतींमुळे लोक त्रासलेले आहेत, त्यापेक्षा जास्त ते एलपीजीवर सबसिडी उपलब्ध नसल्यामुळे अस्वस्थ आहेत. आता एलपीजी अनुदानावर एमओपीएनजी ई-सेवेकडून अधिकृत निवेदन आलेय.
एमओपीएनजी ई-सेवा हे गॅस आणि तेल क्षेत्राशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. एलपीजीच्या सबसिडीची माहिती एका ट्विटद्वारे देण्यात आलीय.

LPG वर सबसिडी का नाही?

एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट करून विचारले, “1 वर्षाहून अधिक काळ झाला, परंतु आम्हाला एलपीजी गॅस सिलिंडरचे अनुदान मिळाले नाही. मी ऑनलाईन पोर्टलवर तक्रार केली होती, पण तिथे कोणी सापडलेच नाहीत. या वापरकर्त्याला प्रतिसाद देताना MoPNG ई-सेवाने ट्विट केले आणि लिहिले- “प्रिय ग्राहक, मे 2020 पासून अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी किमतींमध्ये कोणताही फरक नसल्यामुळे कोणत्याही ग्राहकाला अनुदानाची रक्कम हस्तांतरित केली जाणार नाही.”

सबसिडी पुढे मिळणार की नाही यासाठी करा हे काम

एका ट्विटर वापरकर्त्याने विचारले की, ते पुढे उपलब्ध होईल की नाही. यावर, MoPNG ई-सेवेच्या वतीने ट्विट करून ग्राहकाचा तपशील मागितला. एमओपीएनजी ई-सेवाने ट्विट केले आणि लिहिले-तुमच्या मदतीसाठी कृपया तुमचा 16 अंकी एलपीजी आयडी, एजन्सीचे नाव, जिल्हा, स्थान आणि तुमचा नोंदणीकृत संपर्क क्रमांक आम्हाला डीएम करा. जर तुम्हाला तुमच्या अनुदानाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हे काम करू शकता.

गेल्या महिन्यातही किमती वाढल्या

सध्या अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न फिरत आहे की एलपीजीवरील सबसिडी त्यांच्या खात्यात का येत नाही? याचे उत्तर आज अधिकृतपणे मिळाले. सप्टेंबर महिन्यात एलपीजी किमती वाढण्यापूर्वी 18 ऑगस्टला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली.

संबंधित बातम्या

Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले, पटापट तपासा

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 50 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार, जाणून घ्या

Why LPG cylinders are not subsidized ?, important information provided by the company