jobs in Kuwait : आखाती देश कुवेतमध्ये झालेल्या अपघातात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश भारतीय नागरिक असल्याचं समोर आले आहे. या देशात अनेक भारतीय लोकं नोकरीसाठी येत असतात. या घटनेनंतर अनेकांना असा प्रश्न पडलाय की, भारतातून इतके लोक कुवेत आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये नोकरीसाठी का जातात? कुवेतमध्ये कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यासाठी किती पगार दिला जातो. लिंक्डइननुसार कुवेतमध्ये अशा 8 नोकऱ्या आहेत. ज्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
लिंक्डइनच्या मते, कुवेतमध्ये सर्वाधिक मागणी बिजनेस एडमिनिस्ट्रेटरटची आहे. येथे व्यवसाय झपाट्याने वाढत असल्याने अनेक परदेशी कंपन्याही येथे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथे चांगले कौशल्य असलेल्या लोकांना दर महिन्याला सरासरी ४०० कुवेती दिनार पगार म्हणून दिला जातो. भारतीय चलनात ही रक्कम 1,09,055 रुपये इतकी आहे.
कुवेतमधील दुसरी सर्वात मागणी असलेली नोकरी म्हणजे मॉल व्यवस्थापकाची. कुवेत आणि सौदी अरेबियात आता मॉल संस्कृती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथे जगातील सर्वोत्तम शॉपिंग सेंटर्सही बांधली जात आहेत. त्यामुळेच येथे मॉल मॅनेजरची मागणी देखील वाढत आहे. मॉल मॅनेजरचं काम शॉपिंग सेंटर चालवणे आहे. या कामासाठी दर महिन्याला त्यांना 500 कुवैती दिनार मिळतात. ज्याची भारतीय रुपयांमध्ये किंमत 1,36,319 रुपये इतकी आहे.
कुवेतमध्ये अरबी भाषा बोलली जाते. त्यामुळे येथे इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांची मागणी देखील वाढली आहे. जागतिक बाजारपेठेत इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे येथे इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता आहे. एका इंग्रजी शिक्षकाला येथे दरमहा सरासरी ३०० ते 350 कुवेती दिनार (सुमारे 95,423 रुपये) मिळतात.
कुवेतमध्ये सर्वात जास्त पगार इंजिनिअर लोकांना मिळतो. आखाती देशात पायाभूत सुविधा आता वाढत आहेत. त्यामुळे येथे यावर बरेच काम सुरु आहे. त्यामुळे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सची मागणी येथे खूप वाढलीये. या कामासाठी प्रत्येक महिन्याला सरासरी येथे ६०० ते ७५० कुवेती दिनार (1.63 लाख ते 2.4 लाख रुपये) मिळतात.
कुवेतमध्ये ग्राफिक डिझायनर्सची देखील मोठी मागणी आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातींचे प्रोफाइल, वेबसाइट डिझाईनिंग आणि ग्राफिक्स डिझाईनिंगसाठी येथे या लोकांची मागणी आहे दिलेले आहेत. यासाठी दर महिन्याला 250 ते 350 कुवेती दिनार मिळतात, जे भारतीय रूपयांच्या 95,423 इतके आहे.
कुवेत आणि इतर आखाती देशांमध्ये परदेशी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांना कामगारांची आवश्यकता आहे. पण त्यासाठी एचआर विभागासाठी देखील मागणी आहे. येथे एचआरला दरमहा सुमारे 250 ते 400 कुवैती दिनार मिळतात, जे भारतीय चलनात 1,09,055 रुपयांपर्यंत असू शकतात.
कुवेतमध्ये तेलाचे अनेक कारखाने आहेत. इतर उत्पादन आणि औद्योगिक कामांसाठी सुपरवायजरच्या अनेक नोकऱ्या येथे उपलब्ध आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला सरासरी 600 कुवैती दिनार (सुमारे 1,63,582 रुपये) मिळतात.
कुवेतमधील कंपन्या आणि शॉपिंग मॉल्सची वाढती संख्या पाहता, येथे सेल्सच्या कामासाठी देखील लोकं हवी आहेत. या कामासाठी दर महिन्याला सरासरी 200 ते 400 कुवेती दिनार (सुमारे 1.09 लाख रुपये) मिळतात.