नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोविड 19 प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झालीय. 22 ऑक्टोबरपर्यंत भारताने एक कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. घरातून काम करण्याची संस्कृतीही आता हळूहळू कमी होत आहे. एका वर्षाहून अधिक काळापासून घरातून काम करण्याची सवय लागल्यामुळे TCS, Infosys, HCL Technologies सारख्या शीर्ष IT कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांना ऑफिसमध्ये बोलावून घेण्याची योजना उघड केलीय.
देशातील सर्वात मोठी आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने सांगितले आहे की, ते आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या कार्यालयाच्या डेस्कवर परत बोलावतील. कारण त्यांच्यापैकी जवळपास 70 टक्के कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेय आणि सुमारे 95 टक्के लोकांना एकच लस मिळालीय. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी मिलिंद लक्कर म्हणाले की, कंपनी कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस कार्यालयात बोलवण्याचा विचार करीत आहे. याआधी टीसीएसने सांगितले होते की, वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ते 90 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावतील. आयटी फर्मने कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने आता काम करण्यासाठी हायब्रीड मॉडेलचा अवलंब करणार असल्याचे म्हटले आहे. कोरोना साथीच्या काळात लोकप्रिय झालेल्या संकरित मॉडेलमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणाहून काम करण्याची परवानगी आहे. कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले की, त्यांच्या 86 टक्के कर्मचाऱ्यांना कमीतकमी एक डोस मिळालाय आणि आता कंपनी हायब्रिड मॉडेलसह पुढे जाईल. इन्फोसिसप्रमाणे मॅरिको आणि विप्रो यांसारख्या कंपन्यादेखील हायब्रीड मॉडेलचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे कंपन्यांना कर्मचार्यांच्या प्रवासाच्या वेळेची बचत करण्याव्यतिरिक्त भाडे आणि वीज खर्च कमी करण्यात मदत होत आहे. विप्रोचे चेअरमन ऋषद प्रेमजी यांनी 12 सप्टेंबर रोजी ट्विट केले होते आणि म्हटले होते की, “आमच्या कंपनीचे कर्मचारी उद्यापासून म्हणजेच 13 सप्टेंबरपासून आठवड्यातून दोनदा कार्यालयात येतील. सर्वांना पूर्णपणे लसीकरण केले आहे. सामाजिक अंतर आणि सुरक्षा नियमांचे पालन करेल. आम्ही यावरही लक्ष ठेवू. ”
आयटी दिग्गज एचसीएल टेक्नॉलॉजीज त्याचप्रमाणे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोनदा कार्यालयात बोलावते, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना एका दिवशी यावे लागते. या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्यांच्या योजनेला गती मिळेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या
ही विदेशी बँक खरेदी करण्याच्या शर्यतीत HDFC, Axis, Kotak महिंद्रा; ‘या’ बँकांमध्ये जोरदार स्पर्धा
नियमित गुंतवणूक अन् बचतीमध्ये 1 टक्के नियमाचे काय फायदे? जमा भांडवलामध्ये 5 वर्षांत दुप्पट वाढ
Work from Home is coming to an end soon; What exactly are the plans of TCS, Wipro and Infosys?