नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : टीम इंडियाने अंतिम सामन्यात जागा पक्की करताच, भारतीयांच्या आनंदाला उधाण आले. रविवारी, 19 रोजी विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारत ऑस्ट्रेलियाशी भिडेल. खेळातील हा रोमांच अनुभवण्यासाठी लाखो क्रीडा प्रेमी अहमदाबाद येथे डेरेदाखल झाले आहे. अहमदाबादमध्ये क्रिकेटचा कुंभमेळा भरला आहे. या विश्वचषकात अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले. तर अनेक रेकॉर्ड इतिहासजमा झाले. टीव्ही आणि डिजिटल मीडियात पण अनेक रेकॉर्ड तयार होत आहे. भारत-न्यूझीलंडमधील उपांत्यपूर्व सामन्यात प्रेक्षकांनी पण अनेक रेकॉर्ड तोडेल. हा सामना मैदानासह ऑनलाईन पाहण्यात आला. 5.3 कोटी प्रेक्षकांनी हा रोमांच अनुभवला. आता अंतिम सामन्यासाठी कंपन्यांना 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 35 लाख रुपये मोजावे लागू शकतात.
70 टक्के स्लॉटची अगोदरच विक्री
जाहिरात विश्वातील सूत्रानुसार, वर्ल्डकपच्या सामन्यांचे प्रसारण डिस्ने हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवरु होत आहे. हा विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच कंपन्यांनी जाहिरातींसाठी 70 टक्के स्लॉटची अगोदरच खरेदी केले होते. आता उर्वरीत 30 टक्के जाहिरात स्लॉट विश्वचषकाच्या दरम्यान विक्री झाले. यातील 10 टक्के स्लॉट हे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
जाहिरात दरात मोठी वाढ
भारताने अंतिम सामन्यात धडक देताच जाहिरातीचे दर भडकले. कंपन्यांना 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 35 लाख रुपये मोजावे लागत आहे. अर्थात कमी भावासाठी कंपन्या पण आग्रही आहे. अनेक कंपन्या या सामन्यासाठी 25 ते 30 लाख रुपये मोजायला तयार आहेत. पण डिस्ने हॉटस्टार भाव कमी करायला तयार नसल्याचे समोर येत आहे.
टीव्हीवरील जाहिरात दरात वाढ
सूत्रांनुसार, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातींचा पाऊस पडणार आहे. या जाहिरातींचा भाव दुप्पट झाला आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीला टीव्हीवरील जाहिरातीचा दर प्रति 10 सेकंद 5 ते 6 लाख रुपये होता. तो दर आता 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत पोहचेल. टीव्हीवरील प्रेक्षकांनी 2019 मधील विश्वचषकापेक्षा यंदा 12 टक्क्यांहून अधिकचा काळ घालवला आहे. डिस्ने कंपनीला या उलाढालीतून 2500 कोटींचा फायदा झाला आहे.
दर्शकसंख्येचा तुटला रेकॉर्ड
डिस्ने हॉटस्टारनुसार, या विश्वचषकात दोनदा दर्शकसंख्येचा विक्रम मोडीत निघाला. भारत-दक्षिण अफ्रीका सामना 4.4 कोटी लोकांनी पाहिला. हा एक रेकॉर्ड होता. तर भारत-न्यूझीलंड उपांत्यपूर्व सामन्यात पण विक्रम झाला. यावेळी 5.3 कोटी प्रेक्षकांनी हा सामना पाहिला होता. तज्ज्ञांच्या मते, रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात दोन्ही विक्रम मोडीत निघतील.