SIP for Childrens : आजकाल पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते लहान असल्यापासूनच मेहनत घेत असतात. मुलांना चांगले भविष्य द्यायचे असेल तर त्याची सोय आतापासूनच करावी लागेल. कारण मुलांच्या शिक्षणासाठी आता अफाट पैसा खर्च होतो. मुलांसाठी गुंतवणुकीचे नियोजन कसे सुरु करावे. मुलांसाठी आताच आर्थिक नियोजन केले तर ते मोठे होतील तोपर्यंत एक चांगली रक्कम त्यांच्या नावावर असेल. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत पण एक पर्याय असा आहे जो चांगले रिटर्न देऊ शकतो.
मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्तवाचे आहे. यासाठी म्युच्युअल फंड योग्य आहे. म्युच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक योजना (SIP) मुलाला करोडपती बनविण्यात मदत करेल. जर तुम्ही मुलाच्या जन्मानंतरच नियोजन केले तर 21 वर्षांनंतर मुलाकडे कोट्यावधींचा निधी नक्कीच असेल.
मुलांचे शिक्षण आणि लग्न या दोन्हींचे नियोजन आतापासूनच करा. त्यासाठी SIP सुरु करु शकता. एसआयपीमध्ये मिळालेल्या रिटर्न्समुळे मूल २१ वर्षांचे झाल्यावर तो करोडपती बनू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी सर्वोत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एसआयपी सरासरी १२ ते १६ टक्के परतावा देते. परंतु, काही प्रकरणांमध्ये त्याने 20-30 टक्के परतावाही दिला आहे.
बाळाचा जन्म होताच नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवा. दरमहिन्याला 10,000 रुपये गुंतवू शकता. असे तुम्ही 21 वर्षे केले. तर तुमची एकूण गुंतवणूक 25,20,000 रुपये असेल. परंतु, परताव्यासह त्याचे एकूण मूल्य 1,13,86,742 रुपये होईल. यामध्ये एकूण परतावा 88,66,742 रुपये असेल.
आपण असे गृहीत धरले की SIP मधून तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला. तर तुमची एकूण गुंतवणूक फक्त 25,20,000 रुपये राहील. पण, मिळणारा परतावा खूपच अधिक असेल. 21 वर्षांनंतर, तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 3,86,84,626 रुपये होईल. यावरील परतावा 3,61,64,626 रुपये असेल.