नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात आपले आयुष्य इंटरनेटवर खूप अवलंबून आहे. फंड ट्रान्सफर आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस/यूपीआय यांसारख्या इतर ऑनलाईन पेमेंट पद्धतींच्या बाबतीत हे विशेषतः खरे आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे पाठवत असाल आणि अचानक इंटरनेट कनेक्शन गेले तर काय होईल याची कल्पना करा. बरं यावरही एक उपाय आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आपण आपल्या फोनवरून इंटरनेटशिवाय देखील UPI पेमेंट करू शकता. इंटरनेट नसल्यास राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NPCI ) *99# सुविधा कामी येणार आहे.
*99# ही NPCI ची USSD आधारित मोबाईल बँकिंग सेवा आहे, जी नोव्हेंबर 2012 मध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला ही सेवा फक्त बीएसएनएल आणि एमटीएनएल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होती. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ,*99#द्वारे UPI पेमेंट करण्यासाठी तुमचा फोन नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय एकाच फोन नंबरवरून भीम अॅपवर एक-वेळ नोंदणी देखील आवश्यक आहे.
टप्पा 1- सर्वप्रथम फोनचा डायल पॅड उघडा आणि *99# टाईप केल्यानंतर कॉल बटणावर टॅप करा. हे आपल्याला 7 पर्यायांसह नवीन मेनूवर घेऊन जाईल. मेनूमध्ये पैसे पाठवा, पैसे मिळवा, शिल्लक तपासा, माझे प्रोफाईल, प्रलंबित विनंत्या, व्यवहार आणि यूपीआय पिन यांसारख्या पर्यायांची सूची असेल.
टप्पा 2- जर तुम्हाला फक्त पैसे पाठवायचे असतील तर डायल पॅडवर क्रमांक 1 दाबून पैसे पाठवा पर्याय निवडा. यानंतर तुम्ही फोन नंबर, यूपीआय आयडी किंवा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड वापरून पैसे पाठवू शकाल.
टप्पा 3- नंतर रक्कम प्रविष्ट करा आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI पिन टाका. मग तुम्हाला फक्त ‘Send’ टॅप करायचे आहे.
युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस / यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे त्वरित बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. UPI द्वारे तुम्ही एका बँक खात्याला अनेक UPI अॅप्ससह लिंक करू शकता. त्याच वेळी एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती चालवली जाऊ शकतात.
संबंधित बातम्या
तर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटदेखील करावे लागेल? सर्वात जास्त व्याज कुठे मिळते, जाणून घ्या
कर्ज हस्तांतरणाबाबत नियम बदलले, RBI कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
You can make UPI payment even without internet, it will work