10th Fail Jobs: 18 देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी! दहावी नापासांना सुवर्णसंधी

| Updated on: Aug 16, 2022 | 12:49 PM

गेल्या वर्षी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशाला 87 अब्ज डॉलर पाठवले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, परदेशातून नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल ठरला आहे.

10th Fail Jobs: 18 देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी! दहावी नापासांना सुवर्णसंधी
Mass Communication Jobs
Image Credit source: Social Media
Follow us on

दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक परदेशात नोकरी (Jobs) करण्यासाठी जातात. यामागे अनेक कारणं आहेत, पण सर्वात मोठं कारण म्हणजे पैसा. भारतीयांना परदेशात मोठा पगार मिळतो. त्यातच आता भारतीय कामगारांबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जगातील 18 देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी सातत्याने वाढत आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे परदेशात जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कोरोनापूर्वी (Corona) जेवढे लोक परदेशात जाऊन काम करत होते आता कोरोना महामारीनंतर त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. कोव्हिड साथीच्या आजारानंतर जगभरातील अर्थव्यवस्था (Economy)सुधारण्यास सुरवात झाली आहे. जगातील मोठ्या बाजारपेठा पुन्हा सुरू होत असल्याने. तसे पाहिले तर भारतीय कामगारांच्या मागणीतही वाढ झाली आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांमुळे देशाला खूप फायदा होतो, कारण त्यांनी पाठवलेला पैसा सरकारला मदत करतो. गेल्या वर्षी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशाला 87 अब्ज डॉलर पाठवले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, परदेशातून नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल ठरला आहे.

परदेशात जाणाऱ्यांची संख्या किती?

परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड महामारीपूर्वी 2019 मध्ये परदेशात काम करण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या 94,000 होती. आता या आकडेवारीने मोठी झेप घेतली आहे, कारण आता परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या वाढून 1.90 लाख झाली आहे. अशा 18 देशांमध्ये परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या वाढली आहे, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. भारतीयांना प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड (ECR) पासपोर्टची आवश्यकता आहे. आता ईसीआर पासपोर्ट म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याबद्दल आपण जाऊया…

ईसीआर पासपोर्ट म्हणजे काय आणि कोणाला मिळतो?

दहावीपर्यंत शिक्षण न घेतलेल्या कामगारांना ईसीआर पासपोर्ट दिला जातो. पासपोर्ट कार्यालयाकडून विशेष शिक्का मारून ईसीआर पासपोर्ट दिला जातो. हे पासपोर्टधारक भारतीय कामगार ईसीएनआर (ECNR) प्रकारात मोडतात. लक्षात घेण्यासारखे हे आहे की ईसीआर पासपोर्टधारक कामगारांसाठी कामाचे नियम कठोर नाहीत. या कामगारांना ई-स्थलांतर प्रणालीतून वगळण्यात येतं. अशा परिस्थितीत या लोकांना त्या क्षेत्रात काम करावं लागतं, जिथे कष्टाची जास्त गरज असते. प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशा पदांवर काम करण्यासाठी त्यांची नेमणूक केली जाते.