वनरक्षक भरतीबद्दल शासनाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट वनरक्षक होण्याचे स्वप्न होणार आता पूर्ण

| Updated on: Jan 13, 2024 | 12:05 PM

Forest Department Recruitment 2024 : नुकताच आता वनरक्षक भरती प्रक्रियेबद्दलचे अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट आले आहे. यानंतर उमेदवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळतंय. आता थेट वनरक्षक होण्याचे तुमचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकते. ही मोठी संधी आहे. शासनाकडून या भरती प्रक्रियेसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.

वनरक्षक भरतीबद्दल शासनाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट वनरक्षक होण्याचे स्वप्न होणार आता पूर्ण
Follow us on

मुंबई : वनरक्षक होण्याचे आणि सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न आता पुर्ण होऊ शकते. थेट 1256 पदे ही वनरक्षकांची भरली जाणार आहेत. ही एकाप्रकारची मेगा भरतीच आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलाय. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देखील देण्यात आले. ही भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून खोळंबली होती. मात्र, आता यामधून मार्ग काढत उमेदवारांना मोठा दिलासा हा देण्यात आलाय. आता या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालाय. याबद्दलचे मोठे अपडेट पुढे आलंय.

एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टिसीएस आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली.

त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. शेवटी यामधून मार्ग निघाला असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता दिलीये. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे चार लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे मार्क एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची 25 कि.मी. आणि 16 कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल.

या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया 17 जानेवारी पासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.