AAI Recruitment 2024: विमानतळ प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय थेट नोकरी

| Updated on: Dec 02, 2024 | 2:23 PM

AAI Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उत्तर विभागासाठी अप्रेंटिसच्या 190 पदांची भरती केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.

AAI Recruitment 2024: विमानतळ प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय थेट नोकरी
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना काही समस्या असेल तर helpdesk.rec@aiimsbilaspur.edu.in ईमेलवर अर्ज करावीत. अधिसूचना उमेदवारांनी व्यवस्थित वाचून घ्यावी.
Follow us on

AAI Recruitment 2024: तुम्हाला नोकरीची ही चांगली संधी आहे. विमानतळ प्राधिकरणात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उत्तर विभागासाठी अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत.

पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, एरोनॉटिकल एरोस्पेस मेंटेनन्स, कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग या पदांच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. येथे अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.

AAI Recruitment 2024 पात्रता

AAI Recruitment पदांच्या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून चार वर्षांचा नियमित अभियांत्रिकी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा एनसीव्हीटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

AAI Recruitment 2024 वयोमर्यादा

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादेबाबत बोलायचे झाले तर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयात विशेष सवलत देण्यात येणार आहे.

AAI Recruitment 2024 अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम, AAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • होमपेजवर जा आणि AAI अप्रेंटिस भरती 2024 लिंकवर क्लिक करा.
  • येथे नोंदणी करा, तुमच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येईल.
  • यानंतर अर्ज पूर्णपणे भरावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे आणि अर्ज शुल्क येथे सादर करा.
  • तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
  • AAI अप्रेंटिस निवड प्रक्रिया: निवड कशी करावी

AAI च्या या पदांसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. येथे यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी, एकदा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

लक्षात घ्या की, पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करू शकतात. येथे अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून चार वर्षांचा नियमित अभियांत्रिकी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा एनसीव्हीटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयात विशेष सवलत देण्यात येणार आहे.