नवी दिल्ली: भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी लसीबाबत अमेरिकन शिक्षणसंस्थांनी वेगळी भूमिका घेतली आहे. कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन शिक्षणसंस्थानी पुन्हा एकदा लसीकरण करण्यास सांगितलं आहे. अमेरिकेतील शिक्षणसंस्थांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली नाही. ( American Education institutions said students take vaccine approved by WHO)
वृत्तसंस्था एएनआयनं न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टच्या हवाल्यानं बातमी दिली आहे. भारतातील मिलोनी दोशी या विद्यार्थिनीनं कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या अभ्यासक्रमासाठी तिला अमेरिकेला जायचं आहे. मात्र, कोलंबिया विद्यापीठाकडून तिला दुसरी लस घेण्यास सांगण्यात आलं आहे. मिलोनी दोशी ही विद्यार्थिनी आता पुन्हा लस घेतल्यावर आरोग्यावर काय परिणाम होणार याबाबत चिंतेत आहे.
अमेरिकेबाहेर राहून ज्या विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेनेने मान्यता न दिलेली लस घेतली असेल त्यांना 28 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. अमेरिकेतील एफडीए या संस्थेने मंजुरी दिलेली लस त्या विद्यार्थ्यांना घ्यावी लगाणार आहे.
अमेरिकन सरकारनं त्यांच्या विद्यार्थ्यांना फायजर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन ही लस दिली आहे. या लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली आहे. अमेरिकेत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यासमोर लसीकरणाची अट ठेवली गेली आहे. अमेरिकन काऊन्सिल ऑन एज्युकेशनचे सिनीअर व्हाईस प्रेसिडंट टॅरी डब्लू हार्टेल यांनी परदेशातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी यावं, असं म्हटलं आहे. भारतातून अमेरिकेत दरवर्षी जवळपास 2 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी जातात.
काँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणं बंद करावं; महागाई कमी होईल,भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्यhttps://t.co/2Hv2jllYXT#Congress | #Brijmohanagrawal | #BJP | #Inflation
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
संबंधित बातम्या:
अमेरिका भारताला लसींचा पुरवठा करणार, पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा
( American Education institutions said students take vaccine approved by WHO)