नोकरीसाठी अर्ज करताय? तुमच्या resume मध्ये या दोन ओळी टाकाच, जॉबची गॅरंटी

| Updated on: Dec 17, 2024 | 5:16 PM

तुम्ही जर नवा जॉब शोधत असाल तर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमचा रेझ्युमे, रेझ्युमे तयार करताना अनेक जण काही कॉमन चुका करतात त्याचा फटका तुम्हाला बसण्याची शक्यता असते.

नोकरीसाठी अर्ज करताय? तुमच्या resume मध्ये या दोन ओळी टाकाच, जॉबची गॅरंटी
Follow us on

तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुमच्या समोर सर्वात मोठं चँलेज असतं ते म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात तुमचं शिक्षण पूर्ण केलं आहे, त्याला सुटेबल असा एखादा चांगला जॉब शोधणं. यामध्ये काहींना लगेचच यश येतं, काहींना थोडा उशिर लागतो. तर काहींना त्या क्षेत्रात जॉब भेटत नाही अशा परिस्थितीमध्ये असे लोक दुसऱ्या क्षेत्रात जॉब शोधतात. मात्र यामुळे त्यांच्या नोकरीमधील ग्रोथला ब्रेक लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या क्षेत्रात त्यांचं शिक्षण झालं आहे, त्या क्षेत्राचा आणि ते काम करत असलेल्या क्षेत्राचा दूरपर्यंत संबंध नसतो. अशा व्यक्तींना कालंतराने अनुभवाच्या जोरावर नोकरीत बढती मिळू शकते, मात्र त्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ जातो आणि संबंधित व्यक्तीचं मोठं नुकसानं होतं.

तर काही जण असे असतात ज्यांना त्यांनी ज्या क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलं आहे, त्याच क्षेत्रात जॉब मिळतो मात्र त्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागते, ही प्रतीक्षा काही वर्षांपर्यंत असून शकते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना देखील मोठा फटका बसतो. परंतु असे काही जण असतात, ज्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच जॉब मिळतो, त्याची अनेक कारणं आहेत मात्र या सर्वांमध्ये एक महत्त्वाचं आणि कॉमन कारण म्हणजे तुमचा रेझ्युमे असतो.

सर्वसामान्यपणे एखाद्या कंपनीमध्ये किंवा इतर ठिकाणी नोकरीची संधी निघाली की तुम्ही संबंधित पोस्टसाठी अर्ज करता. नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही तुमचा रेझ्युमे सोबत जोडता, तुमचा रेझ्युमे तुम्ही संबंधित कंपनीच्या मेलआयडीवर मेल करता किंवा तिथे प्रत्यक्ष नेऊन देता.

तुमचा रेझ्युमे कितीही आकर्षक असला तुमचं शिक्षण आणि अनुभव कितीही असलं आणि जर तुमची रेझ्युमेमधील मांडणीची पद्धत चुकली तर तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे रेझ्युमे बनवता एक काळजी घ्यावी. जेव्हा एखादी कंपनी एखाद्या जागेसाठी पदभरती काढते, तेव्हा ती त्या जागेसाठी तुमच्याकडे काय स्किल आवश्यक आहे, याची देखील माहिती देत असते.

अशावेळी तुम्ही तुमचा रेझ्युमे तयार करताना कंपनीला आवश्यक असणारी कौश्यल लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये तुमचं शिक्षण, कुठं काम केलं त्याची माहिती, कामाचा अनुभव या गोष्टी तर लिहीतच असतात. मात्र त्याचबरोबर जर कंपनीला आवश्यक असणारी कौश्यल तुमच्याकडे असल्यास त्याचा उल्लेख रेझ्युमेमध्ये ठळक अक्षरात करा. यामुळे होतं काय की तुमचा रेझ्युमेकडे एचआरचं लक्ष  पटकनं जातं, आणि तुमची त्या पदासाठी निवड होण्याची शक्यता वाढते. तसेच शक्यतो अशाच ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करावा, जी कौशल्य तुमच्या प्रोफाईल्सशी सुटेबल असतील.