आर्मी स्कूलमध्ये बंपर भरती, विविध पदे जाणार भरली, लगेचच करा अर्ज आणि

| Updated on: Sep 10, 2024 | 4:18 PM

AWES Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

आर्मी स्कूलमध्ये बंपर भरती, विविध पदे जाणार भरली, लगेचच करा अर्ज आणि
Army School
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया आर्मी पब्लिक स्कूलमधील रिक्त पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, प्राथमिक शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, लेखापाल अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची थेट संधी आहे. 

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

ऑनलाईन चाचणी उमेदवारांची घेतली जाईल. परीक्षा 23 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली जाईल. 12 नोव्हेंबर रोजी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले जातील. ही प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइटवरूनही डाउनलोड करता येतील. यासाठी आपल्याला आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

awesindia.com. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील मिळेल. परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 385 रुपये फीस ही द्यावी लागले. अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.