बँकेत नोकरीची संधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Jun 24, 2024 | 2:30 PM

Bank Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

बँकेत नोकरीची संधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
job
Follow us on

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. रेप्को बँकेकडून ही भरती सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. एकून 20 पदांसाठी ही भरती सुरू आहे.

रेप्को बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत कार्यालयीन सहाय्यकाच्या पदासाठी ही भरती सुरू आहे. वीस पदांसाठी ही भरती आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. मान्यताप्राप्त बोर्डाकडून उमेदवाराने दहावी पास केलेली असावी.

या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आलीये. 18 ते 30 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना 250 रूपये फीस ही लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. repcobank.co.in या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 10 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इच्छुक उमेदवारांना शेवटच्या तारखेच्या अगोदरच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दहावी पास असणाऱ्यांनी कोणत्याही विचार न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. गेल्या काही दिवसांपासून अनेक बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत.