मुंबई : बँकिंग सेक्टरमध्ये करिअर (Banking Jobs) बनवण्याचं स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Career) ब्रांच रिसिवेबल मॅनेजर (Branch Receivable Manager) या पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह गोव्यातही या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 159 पदांवर ही भरती केली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेदरम्यान, महाराष्ट्र आणि गोव्यासह उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि बिहारमध्येही भरती केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 14 एप्रिलपर्यंत या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल. कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. सोबत बँकेत किंवा वित्तीय संस्थांमध्ये किंवा संबंधित कार्यालयात काम केलेल्या व्यक्तीही या पदासाठी अर्ज करु शकतात. वित्तीय संस्थेत दोन वर्ष काम केल्याचा अनुभव या पदासाठी गरजेचा आहे. तर वय वर्ष 23 ते 35 वर्ष वय असलेल्यांना या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल.
ब्रांच रिसिवेबल मॅनेजर
159
23 ते 35 वर्ष
कोणत्याही विद्यालयातून पदवीधर
14 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख
बँक ऑफ बडोदाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांना अर्ज करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत फॉर्म भरता येऊ शकले. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं उच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी तरुणांसाठी चालून आली आहे. या बँकेत नोकरीची संधी असून अर्ज करण्याची मुदत संपण्याआधी ऑनलाईन फॉर्म भरण्याचं आवाहन केलं जातंय.
CISF Recruitment 2022 : सीआयएसएफमध्ये खेळाडूंसाठी 249 पदांवर मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगाराची संधी