BECIL Recruitment 2022 नवी दिल्ली : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंटस इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी चांगली संधी निर्माण झालीय. बीईसीआयलमध्ये पर्यवेक्षक आणि सुपरवायझर पदाच्या 500 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बीईसीआयएलनं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागण्यात आले आहेत. ऑल इंडिया क्वार्टर्ली इस्टॅब्लिशममेंट अंतर्गत रोजगार सर्वे आणि स्थलांतरित मजुरांचा सर्वेक्षण करण्याचं काम करावं लागणार आहे. 17 जानेवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 25 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. अर्ज दाखल केल्यानंतर उमदेवारांना ईमेल द्वारे अर्ज करावे लागणार आहेत.सुरुवातीला ऑनलाईन अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचं शुल्क जमा करावं लागणार नाही. ज्या उमदेवारांच्या अर्जाची निवड होईल त्या उमेदावारांना शुल्क भरावं लागेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 आणि राखीव प्रवर्गातील उमदेवारांना 350 रुपये शुल्क सादर करावं लागेल.
स्टेप 1 : उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अधिकृत भरती पोर्टल becil.com ला भेट द्यावी.
स्टेप 2: होम पेजवरील करिअरच्या लिंकला भेट द्या. तिथे जाहिरात क्रमांक 112 या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3 : मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा.
स्टेप 4 : ऑनलाईन अर्ज सादर करुन त्याची प्रिंट आऊट घ्या. .
स्टेप 5 : ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर projecthr@becil.com या ईमेल आयडीवर अर्ज पाठवा
बीईसीआयएलकडून पर्यवेक्षक पदासाठी 350 तर सुपरवायझरच्या 150 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
बीईसीआयएलमधील पर्यवेक्षक आणि सुपरवायझर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 50 वर्षांपेक्षा कमी असावं. उमदेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. जर आवश्यकता असेल तर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
इतर बातम्या:
IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑईलमध्ये अप्रेटिंसची सुवर्णसंधी, 570 जागांसाठी अर्ज करण्याचं आवाहन
Mhada Hall Ticket : म्हाडाकडून ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?
BECIL Recruitment 2022 Broadcast Engineering Consultants India Limited invited 500 applications for various post check details here