नवी दिल्ली: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) च्या 28 पदांच्या भरतीसाठी कंपनीने नोटिफिकेशन जारी केलं आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट hwr.bhel.com वर जाऊन अर्ज करू शकतात.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मधील जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 नोव्हेंबर 2021 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2021 निश्चित करण्यात आलेली आहे. मुदतीनंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, असं भेल इंडियाकडून कळवण्यात आलं आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
अर्ज कुठं करायचा?
BHEL मध्ये जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO)च्या 28 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट- hwr.bhel.com वर क्लिक करून देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा देखील पूर्ण केलेला असावा. उमेदवाराने राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली असावी.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 37 वर्षांपेक्षा जास्त नसावे. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्जात दिलेल्या गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर सूचना दिली जाईल.उमेदवारांना कागदपत्रं पडताळणीसाठी चेन्नईला जावे लागेल.
इतर बातम्या