मुंबई महापालिकेत 1850 ते 2070 पदांवर कंत्राटी तत्वावर भरती, 30 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार

| Updated on: Jun 22, 2021 | 6:44 PM

मुंबई महापालिकेने देखील कोरोना तिसऱ्या लाटेचा समाना करण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये विविध जम्बो कोविड सेंटर्ससाठी डॉक्टर्स, परिचारिकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेत 1850 ते 2070 पदांवर कंत्राटी तत्वावर भरती, 30 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार
mumbai municiple corporation
Follow us on

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तयारी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने देखील कोरोना तिसऱ्या लाटेचा समाना करण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये विविध जम्बो कोविड सेंटर्ससाठी डॉक्टर्स, परिचारिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही नेमणूक तीन महिन्यांच्या कालावधीकरिता करण्यात येणार आहे. सुमारे 1850 ते 2070 पदांवर कंत्राटी पद्धतीनं भरती करण्यात येईल.( BMC invited applications for contract base post in jumbo covid center)

अर्ज कसा सादर करायचा?

मुंबई महापालिकेच्या covid19mcgm@gmail.com या किंवा stenodeanl@gmail.com या ई-मेलवर पात्र उमेदवारांनी प्रमणापत्रांच्या प्रतींसह 26 जून 2021 पर्यंत 4 वाजता अर्ज करणं आवश्यक आहे.

पदांची संख्या

मुंबई महापालिका पदभरती

शैक्षणिक पात्रता:

1. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हीस्ट (एमडी मेडिसिन) अॅनेस्थेटिस्ट (एमडी) नेफ्रॉलॉजिस्ट (डीएम कार्डिओलोजिस्ट (डीएम) न्युरोलॉजिस्ट (डीएम ) :

1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधारक / अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा.

2. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा.

2. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS

1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधारक शाखेचा पदवीधारक असावा.

2. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा ( आयुर्वेद व होमिओपथिक संस्था नोंदणीकृत असावा.

3. प्रशिक्षित अधिपरिचारिका:

1. उमेदवार बारावी पास व जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदविकाधारक असावा / असावी

2. उमेदवार योग्य त्या नर्सिंग काऊंन्सिल चा नोंदणीकृत असावा.

वयोमर्यादा :

उमेदवाराचे वय  01/06/2021 रोजी 18 वर्षा पेक्षा कमी व 33 वर्षा पेक्षा अधिक असता कामा नये. अर्जासोबत जन्माचा दाखला / तत्सम प्रमाणपत्र सादर करावं.

संबंधित बातम्या:

Maharashtra Corona Vaccination : महाराष्ट्रात आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

BMC invited applications for contract base post in jumbo covid center