BMC Recruitment 2021: मुंबई महापालिकेत विविध पदांवर भरती, 45 हजारांपर्यंत पगाराची संधी

| Updated on: Oct 05, 2021 | 4:46 PM

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेले उमदेवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करु शकतात.

BMC Recruitment 2021: मुंबई महापालिकेत विविध पदांवर भरती, 45 हजारांपर्यंत पगाराची संधी
मुंबई महापालिका
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेले उमदेवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करु शकतात. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती

मुंबई महापालिकेत कंत्राटी तत्वावर समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

पात्रता

समाज विकास अधिकारी पदासाठी उमेदवार समाजकार्य अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य अभ्यासक्रमाची पदवी घेतेलेली असणं आवश्यक आहे. सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी देखील समाज कार्य पदवी अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 20 वर्षांहून अधिक काळ अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे. समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज जमा करायचा आहे. समाज विकास अधिकारी पदासाठी उमेदवारांना 45 हजार रुपये पगार तर सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना 35 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

स्टेट बँकेत 2056 जागांवर भरती

स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. स्टेट बँकेत या भरतीद्वारे 2056 जागांवर भरती केली जाणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.co.in या वेबसाईटवरील करिअर टॅबमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा.

स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदावारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

इतर बातम्या:

FSSAI Recruitment 2021: एफएसएसएआयमध्ये 254 जागांवर भरती, अर्ज कसा करायचा?

SBI PO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रोबेशनरी ऑफिसर पदाचं नोटिफिकेशन जारी, 2056 पदांवर भरती

BMC invites application on contract base for social development officer post