CA Final Result 2022: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) शुक्रवारी, आज सीए फायनल रिझल्ट २०२२ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. मे महिन्यात परीक्षा झाली होती. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून आपला निकाल डाउनलोड (How To Download Result CA) करू शकतात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI CA Final Results 2022) आयसीएआय सीए फायनल रिझल्ट 2022 साठी अधिकृत जाहीर केलेली तारीख जाहीर केली नसली, तरी शुक्रवार, 15 जुलै 2022 रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे अहवालात सुचविण्यात आले होते. आता, आयसीएआय सीए फायनल मे निकाल 2022 सर्वांसाठी icai.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे.
आयसीएआय सीसीएम, श्री. धीरज खंडेलवाल यांनीही एक ट्विट लिहून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.”जे विद्यार्थी सीए झालेले आहेत अशा सर्वांचं अभिनंदन!” अशा आशयाचं एक ट्विट त्यांनी केलंय.
12449 CA final students status now be changed to CA . What a proud moments for them and their families . Once again congratulations let’s dm with change status . ??
— DHIRAJ KHANDELWAL (@kdhiraj123) July 15, 2022
आयसीएआय सीए फायनल मे परीक्षा 2022 अधिकृतपणे 14 मे ते 29 मे 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. आता, उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात आणि त्यांनी कशी कामगिरी केली हे पाहू शकतात कारण इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे सत्रासाठी आयसीएआय सीए अंतिम निकाल 2022 जाहीर केला आहे.