नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडून ही भरती राबवली जातंय. या मेगा भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. 16 ऑक्टोबरपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर, स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसरसह विविध पदांचा समावेश आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
21 ते 35 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 400 रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवार आणि महिला यांना फीस भरण्याचे टेन्शन नसणार आहे. recruitment.itbpolice.nic.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.