CBSE 10th Results 2022 live: सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आज दहावीचा 14 जुलैला दहावीचा (10th Results CBSE) निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो. या संदर्भांतली कुठलीही अधिकृत माहिती अजून हाती आलेली नाही. विद्यार्थ्यांनी आताच तयार होऊन आपले प्रवेशपत्र (Admit Card) काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक तपशील आवश्यक असतील. विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा results.gov.in जाहीर केला जाईल.
सीबीएसई बोर्डाची दहावी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 33 टक्के गुण आवश्यक आहेत. 33 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणारे विद्यार्थी नापास मानले जातील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षा देण्याचा पर्याय असेल.
यंदा सुमारे 21 लाख मुलांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यामध्ये 8,94,993 मुली आहेत, तर 12,21,195 मुले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत 22,732 शाळांनी बोर्डाच्या परीक्षा घेतल्या होत्या.
2021- 99.04 टक्के
2020- 91.46 टक्के
2019- 91.10 टक्के
2018- 86.7 टक्के
2017- 93.12 टक्के
दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उमंग ॲपच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. उमंग (युनिफाइड मोबाइल ॲप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) हे केंद्र व राज्य सरकारच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे एक मोबाइल ॲप आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
सीबीएसईकडून दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बोर्डाने निकालाच्या तारखेचा आधीचा पॅटर्न पाहिला तर सीबीएसई निकाल जाहीर होण्याच्या दोन-तीन तास आधी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करते.
विद्यार्थ्यांनी आताच तयार होऊन आपले प्रवेशपत्र काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक तपशील आवश्यक असतील.