CBSE 12th 10th Result 2022 Live: अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) बारावीचा निकाल आज, 22 जुलैला लावण्यात आलेला आहे. विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून निकालाची वाट बघत होते. नुकताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर होण्याबाबत सांगितलं होतं की, सीबीएसईचा निकाल (CBSE) जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. 2 बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झाले. ते पुढे म्हणाले की, सीबीएसईचा निकाल (CBSE 12th Result 2022) तपासण्यासाठी 45 दिवस लागतात, आज फक्त 30 दिवस झाले आहेत. निकाल यथावकाश जाहीर होतील. सीबीएसईने शुक्रवारी सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात.
मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी 90% आणि 95% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, परंतु यावर्षी सीबीएसईच्या दहावीच्या निकालात एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी खूपच कमी आहे. यंदा एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.4% आहे, जी गेल्या वर्षी ही 99.04% होती.
अधिकृत वेबसाइट्स
मोठ्या प्रतीक्षेनंतर सीबीएसई दहावीचा निकाल लागलेला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं ट्विट करत माहिती दिलीये…
Central Board of Secondary Education (CBSE) announces Class 10 results pic.twitter.com/YKjX2cHgpj
— ANI (@ANI) July 22, 2022
26 एप्रिल ते 24 मे 2022 दरम्यान सीबीएसईने देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा आयोजित केली होती.
सीबीएसई दहावीच्या परीक्षेत 94.40 टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीचा निकाल जाहीर केला
Central Board of Secondary Education (CBSE) announces Class 10 results pic.twitter.com/YKjX2cHgpj
— ANI (@ANI) July 22, 2022
सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; 92.71% विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण
सीबीएसईच्या 12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून सुरू होणार
सीबीएसई दहावीचा निकालही आज जाहीर होणार आहे. काही वेळातच निकाल जाहीर होतील.
जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के लागला आहे, तर केंद्रीय विद्यालयाचा निकाल 97.04 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात त्रिवेंद्रमने सर्व झोनमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे राहणाऱ्या तान्या सिंग हिने बारावी परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. तान्या सिंग ही बुलंदशहरमधील दिल्ली पब्लिक स्कूलची (डीपीएस) विद्यार्थिनी आहे.
सीबीएसई दहावीचा निकालही आज जाहीर होणार आहे. काही वेळातच निकाल जाहीर होतील. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
सीबीएसई 12 वी कंपार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे. या आधी बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला. त्याचबरोबर दहावीचा निकालही आज लागणार आहे.
यावेळीही विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. 94.54% विद्यार्थिनी आणि 91.25% विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
सीबीएसई बोर्डाचा निकाल उमंग ॲपवरही उपलब्ध असेल. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही निकाल तपासू शकाल.
यावेळी सीबीएसई 12 वी च्या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी 92.71% राहिली आहे, जी वर्ष 2020 पेक्षा चांगली आहे. त्यावेळी 88.78% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र, गेल्या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी 99.37 टक्के होती.
सीबीएसई दहावीचा निकालही आजच जाहीर होणार आहे. काही वेळातच निकाल जाहीर होतील. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
सीबीएसईने शुक्रवारी (22july) सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात.