CDS 2021 नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगानं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस 2 भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. युपीएससीच्या वेबसाईटवर या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल. नोटिफिकेशन पाहण्यासाठी upsc.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. सीडीएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत 24 ऑगस्ट 2021 आहे. एकूण 339 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
अर्ज दाखल करण्यास सुरुवात: 4 ऑगस्ट
अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख : 24 ऑगस्ट
सीडीएसचा अर्ज मागं घेण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर
सीडीएस परीक्षेची तारीख : 14 नोव्हेंबर
स्टेप 1 : यूपीएससीची वेबसाईट upsconline.nic.in ला भेट द्या .
स्टेप 2 : सीडीएस 2 भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : सीडीएस 2021 साठी नोंदणी करा.
स्टेप 4 : नोंदणीसाठी सर्व माहिती नोंद करा.
स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रं स्कॅन करुन अपलोड करा.
स्टेप 6 : अर्जाचं शुल्क भरुन अर्ज सादर करा.
आयएमए अँड ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक आहे. इंडियन नावल अॅकडमीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण असलं पाहिजे. एअर फोर्स अकॅडमीसाठी अभियांत्रिकीतील पदवीसह बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित विषय असणं आवश्यक आहे. उमेदवारांचं वय 19 वर्षे ते 25 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
यूपीएससीतर्फे 14 नोव्हेंबरला लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांचा एसएसबीतर्फे घेण्यात होणाऱ्या मुलाखतीला सामोरं जावं लागेल.
इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून : 100 जागा
इंडियन नावल अकॅडमी, एझिमाला : 22 जागा
एअर फोर्स अकॅडमी, हैदराबाद: 32 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई: 169 जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई (महिला) : 16
महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना परीक्षेसाठी शुल्क भरावं लागणार नाही. इतर प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावं लागेल.
सीडीएस परीक्षेची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
सीडीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी क्लिक करा
इतर बातम्या:
Maratha Reservation : मोदी सरकारचा मुळावर घाव, थेट 102 व्या घटनादुरुस्ती कायद्यात बदल करणार!
CDS 2 2021 Exam UPSC released notification today apply online at upsconline nic in check details here