नवी दिल्ली : CISF ASI Recruitment 2021: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने सहाय्यक उपनिरीक्षकांच्या पदावर 2020च्या भरतीसाठी विरुद्ध मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (LDCE) अधिसूचना प्रकाशित केल्या आहेत. यामध्ये सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पदांवर अर्ज करू शकतात. 5 फेब्रुवारी 2021 ही या अर्जासाठीची शेवटची तारिख असणार आहे. (cisf asi recruitment 2021 how to apply know about salary and application process)
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 690 रिक्त जागा सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी भरती करण्यात येणार आहेत. इतकंच नाहीतर, अंतिम निवडीच्या वेळी रिक्त जागांची संख्या वाढू किंवा कमी होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल / जीडी कॉन्स्टेबल / ट्रेडमॅन आणि कॉन्स्टेबल म्हणून नियमित सेवेची 5 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत.
CISF ASI Recruitment 2021: महत्त्वाच्या सूचना
– या नोकरीसाठी इच्छूक उमेदवार @ cisf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
– सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी 690 रिक्त जागा अधिसूचित करण्यात आल्या आहेत
– सूचनेची तारीख – 4 जानेवारी 2021
– अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 फेब्रुवारी 2021
– जॉब लोकशन – नवी दिल्ली
नोकरीसंबंधी महत्त्वाच्या तारखा
– अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2021
– डीआयएसजी प्राप्त संबंधित अर्जाद्वारे अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख : 12 फेब्रुवारी 2021
– सीआयएसएफ एसएसजी नोएडा इथं सेवा रेकॉर्डची तपासणी पूर्ण करणं : 12 मार्च 2021
काय असावी अर्जदाराची पात्रता
– शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं महत्त्वाचं आहे.
– यासाटी 35 वर्षे वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.
काय असेल निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड सेवा रेकॉर्ड, लेखी परीक्षा, शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. तर अंतिम यादी गुणवत्ता यादीच्या आधारे तयार केली जाईल. (cisf asi recruitment 2021 how to apply know about salary and application process)
संबंधित बातम्या –
(cisf asi recruitment 2021 how to apply know about salary and application process)