नवी दिल्ली: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने कॉन्स्टेबल/ फायरच्या पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF Recruitment) वेबसाईटवर अर्ज करू शकतात. 4 मार्च 2022 ही या अर्जासाठीची शेवटची तारिख असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 1149 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गात 489 पदं, ईडब्लूएस (EWS) 113, एससी 161, एसटी 137 आणि ओबीसी 249 जागासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी फक्त पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 23 दरम्यान असणं आवश्यक आहे. उमेदवार बारावीला विज्ञान प्रवर्गातून उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे.
सीआयएसफतर्फे ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज स्वीकारले जातील. अन्य कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, ओएमआर पद्धतीनं बहूपर्यायी प्रश्न स्वरुपात घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार रुपये पगार मिळेल. अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना डीसीपीएस पेन्शन सेवा लागू असेल.
स्टेप 1 : प्रथम सीआयएसफकडून जारी करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा
स्टेप 2 : सीआयएसफच्या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 3 : www.csifrectt.in या वेबसाईटवर अर्ज दाकळ करा
स्टेप 4 : ऑनलाईन अर्ज दाखल करा
स्टेप 5 : फोटो सही आणि कागदपत्रं अपलोड करा आणि ऑनलाईन अर्ज सादर करुन त्याचं शुल्क जमा करा
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी एससी, एसटी आणि माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवार सोडून इतरांना 100 रुपये शुल्क भरावं लागणर आहे. यूपीआय किंवा डेबिट कार्ड द्वारे ते शुल्क जमा करु शकतात.
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाशी सलंग्नित महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलं असाव. त्याचं वय 18 ते 23 दरम्यान असावं.
Funny Video : तीन चोरटे मिळून एक एलईडी टीव्हीही चोरू शकले नाहीत, CCTV कॅमेऱ्यात सर्व काही रेकॉर्ड
राऊतांचं झिंग झिंग झिंगाट फडणवीसांच्या भीतीमुळं! नव्या वाईन धोरणावर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!
CISF invited application for 1200 constable fire post check details here