Marathi News Career Job alert CISF Constable Recruitment 2022 for 12th pass and sports quota candidates know Apply for head constable post which will give salary upto 80 thousand plus
12वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! मिळेल 81,000/- पर्यंत पगार, कसा करायचा अर्ज?
CISF Recruitment 2022 : आंतरराष्ट्रीय खेळांत किंवा एथलॅटिक्स टूर्नामेन्टमध्ये राज्य किंवा देश पातळीवर ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, अशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी
Follow us on
बारावी पास (12th HSC pass students) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. सोबत जर बारावी पास असलेल्या असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळांत किंवा एथलॅटिक्स टूर्नामेन्टमध्ये राज्य किंवा देश पातळीवर (National Level) ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, अशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्पोर्ट्स क्वोटामध्ये असलेल्या आणि बारावी पास झालेल्यांना सीआयएसएफ (CISF recruitment 2022) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात हेड कॉन्स्टेबलपदासाठी नोकरीची संधी आहे. चला तर जाणून घेऊयात या नोकरीसाठी कसं, कुठे आणि कधीपर्यंत अप्लाय करता येऊ शकेल?
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात भरती केली जाणार आहे. या भरतीप्रकियेला सुरुवात झाली असून याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 31 मार्चपर्यंत उमेदवारांना सीआयएसएफमधील भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करता येतील. 249 पदांवर सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. cisf.gov.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येऊ शकेल.
वय वर्ष 18 ते 23 असलेल्यांना या पदसाठी अर्ज करता येऊ शकेल. तसंच एससी आणि एसटीसाठी वयात पाच वर्षांची सूटही दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. तर ओबीसी वर्गासाठी उमेदवारांना ती वर्षांची सूट दिली जाणार आहे. वयोमर्यादेची पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सीआयएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विस्तृत माहिती मिळवता येऊ शकेल.
संपूर्ण प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळाल्यास 25 हजारपासून ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना निवड प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. यासाठी इच्छुक उमेदावारांना 31 मार्चच्या अगोदर आपला अर्ज द्यावा लागणार आहे.
दरम्यान, महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातींमधील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही आहे. तर इतर सर्व वर्गातील उमेदावारांकडून 100 रुपये शुल्क अर्जासाठी आकारलं जाणार आहे.
सीआयएसएफमध्ये भरती होण्यासाठी बारावी पास आणि स्पोर्ट्स कोटामध्ये प्रतिनिधित्व केलेलं असणं महत्त्वाचं आहे.