सीआयएसएफमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, बारावी पास आहात?, तर लगेचच करा अर्ज

| Updated on: Aug 22, 2024 | 5:38 PM

CISF Constable Fireman Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांंसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. बारावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.

सीआयएसएफमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, बारावी पास आहात?, तर लगेचच करा अर्ज
CISF
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे बारावी पास उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कॉन्स्टेबल फायरमनच्या पदासाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया 1100 हून अधिक पदांसाठी सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

ही भरती प्रक्रिया सीआयएसएफकडून राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया एकून 1130 पदांसाठी सुरू आहे. 21 ऑगस्ट 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 

cisfrectt.cisf.gov.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे. फक्त शिक्षणच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे  18 ते 23 दरम्यान असावे. आरक्षणानुसार वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 100 रूपये फीस ही द्यावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 21700 रुपये ते 69100 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही अगोदर व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. बाकी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला अधिसूचनेमध्येच वाचण्यास मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची संधी नक्कीच आहे.