मुंबई: कोरोना विषाणू संसर्गामुळं यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे देशातील विविध बोर्डांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ आणि सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थेत वाणिज्य शाखेला असाधारण महत्व आहे. वाणिज्य शाखा ही प्रमुख विद्या शाखा म्हणून समजली जाते. महाराष्ट्रात वाणिज्य शाखेची नामांकित महाविद्यालय आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल देखील चांगला आहे.
विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण वाणिज्या शाखेतून घेतल्यानंतर पुढं देखील वाणिज्य शाखेची निवड करणं त्यांच्या करिअरसाठी महत्वाचं ठरु शकतं. बारावीनंतर विद्यार्थी फायनान्स, अकाऊंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटींग, गुंतवणूक क्षेत्र, विमा क्षेत्र, बँक असं मोठं क्षेत्र वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं आहे.
भारत सरकारनं मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून विद्यार्थी बी.कॉमला प्रवेश घेऊ शकतात. पुढील तीन वर्षांचा अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांनी नेमका कोणता विषय निवडायचा हे स्वत:ची आवड लक्षात ठेऊन आहे.
बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम देखील विद्यार्थ्यांना बारावी वाणिज्य उत्तीर्ण झालेल्यांसाठी उपलब्ध आहे. देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो.
देशातील विविध विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमाची फी साधारणपणे 1 लाख ते 5 लाख इतकी असते.
आयसीएआय या सीए परीक्षांचं नियमन करणाऱ्या संस्थेकडे नोदंणी करुन विद्यार्थी बारावी नंतर पाच वर्षांसाठी सीएची परीक्षा देऊ शकतात. या अभ्यासक्रमाची वार्षिक फी 55500 इतकी आहे.
सीएस अभ्यासक्रमाची फी 60100 इतकी आहे. सीएस साठी विद्यार्थ्यांना वार्षिक 60100 इतकी फी भरावी लागेल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येतं.
वाणिज्य पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराचं विस्तीर्ण क्षेत्र खुलं होतं. अकाऊंटंट, फायनान्शिअल अनालिस्ट, अकाऊंट एक्झ्युकेटिव्ह, कनिष्ठ अकाऊंटंट, बिझनेस एक्झ्युकेटिव्ह म्हणून विद्यार्थी काम करु शकतात. विमा सल्लागार म्हणून देखील विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध होते. तर आयबीपीएस तर्फे घेण्यात येणाऱ्या बँकांच्या परीक्षा, स्टेट बँक, आरबीआयमधील नोकऱ्यांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थी संधी प्राप्त करु शकतात.
विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते ह्युमन रिसोर्स एक्झ्युकेटिव्ह, फायनान्स अनालिस्ट, मार्केंटिग एक्झ्युकेटिव्ह, मार्केटिंग मॅनेजर, बिझनेस डेव्लहपमेंट ऑफिसर, ऑपरेशन टीम लीडर , विक्री अधिकारी पदावर नोकरी मिळवू शकतात.
इतर बातम्या:
courses and career after class 12 in commerce stream check details here