CUET-UG परीक्षेमध्ये मोठा बदल, जाणून घ्या

| Updated on: Jan 03, 2025 | 3:10 PM

CUET 2025: तुम्ही CUET-UG 2025 ही परीक्षा देणार असाल तर यात मोठा बदल करण्यात आला आहे. CUET-UG 2025 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बारावीत कोणत्याही विषयाचा अभ्यास केला असला तरी कोणत्याही विषयाला बसण्याची मुभा देण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाच विषयांमध्ये परीक्षा देता येणार आहे. याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.

CUET-UG परीक्षेमध्ये मोठा बदल, जाणून घ्या
Follow us on

CUET-UG देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आता विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात CUET-UG ला बसण्याची परवानगी असेल, मग तो विषय बारावीत घेतलेला असो वा नसो. पुढील वर्षापासून म्हणजेच 2025 पासून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 5 विषयांसाठी CUET-UG मध्ये परीक्षा देता येणार आहे. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी मंगळवारी CUET-UG परीक्षेशी संबंधित एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पुढील वर्षापासून CUET-UG 2025 परीक्षेत अनेक बदल होणार असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले.

5 विषयांसाठी CUET-UG मध्ये परीक्षा देता येणार

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले की, आता विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात CUET-UG ला बसण्याची परवानगी असेल, मग ते बारावीत कोणत्याही विषयात शिकले असतील तरीही. पुढील वर्षापासून म्हणजेच 2025 पासून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 5 विषयांसाठी CUET-UG मध्ये परीक्षा देता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

यूजीसीचे अध्यक्ष म्हणाले की, CUET-UG परीक्षा 2025 पासून केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल आणि विषयांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. यंदा एकूण विषय 63 वरून 37 करण्यात आले आहेत. यंदापासून आम्ही 20 भाषा विषय कमी करत आहोत. गेल्या वर्षी 29 डोमेन-स्पेसिफिक विषय होते आणि आम्ही ते कमी करून 23 करत आहोत.

परीक्षेच्या वेळेतही बदल?

CUET-UG परीक्षांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता परीक्षेचा कालावधी 60 मिनिटांचा असेल, तर गेल्या वर्षी काही परीक्षांची वेळ 60 मिनिटे तर काही विषयांसाठी 45 मिनिटांची वेळ देण्यात आली होती.

सर्व 50 प्रश्न सक्तीचे

गेल्या वर्षी परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले होते, त्यापैकी 40 प्रश्नांचा पर्याय निवडण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते, मात्र यंदा सर्व 50 प्रश्न सक्तीचे असतील.

2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) मध्ये सातत्याने आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पहिल्या वर्षी तांत्रिक बिघाड, अचानक परीक्षा केंद्र बदल आणि लॉजिस्टिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना निकालाला उशीर सहन करावा लागला.

त्यानंतर 2023 मध्ये उत्तरपत्रिकेत चुका झाल्याने प्रत्येक चुकीच्या उत्तराच्या चॅलेंजसाठी विद्यार्थ्यांना 200-200 रुपये मोजावे लागले. इतकंच नाही तर नीट यूजी पेपर फुटल्याच्या आरोपांमुळे यंदाचा CUET चा निकालही लांबणीवर पडला होता.