DRDO Recruitment 2022: कायच ती खास बातमी, परीक्षा न देताच मिळणार नोकरी ! DRDO मध्ये सुवर्णसंधी

| Updated on: May 25, 2022 | 1:29 PM

डीआरडीओ रिसर्च असोसिएट या पदाची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक उमेदवार वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतात.

DRDO Recruitment 2022: कायच ती खास बातमी, परीक्षा न देताच मिळणार नोकरी ! DRDO मध्ये सुवर्णसंधी
परीक्षा न देताच मिळणार नोकरी !
Image Credit source: Twitter
Follow us on

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर रिसर्च असोसिएट (Research Associate) पदासाठी अर्ज मागवले आहेत. डीआरडीओ रिसर्च असोसिएट या पदाची निवड इंटरव्ह्यूच्या (Interview) आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक उमेदवार वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतात. 13 जून, 14 जून आणि 15 जून 2022 रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी डिफेन्स लॅबोरेटरी, रतनदा पॅलेस, जोधपूर-342 011 (राजस्थान) इथे जावं लागेल. या पदासाठी उमेदवाराला रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / मटेरियल सायन्स मध्ये पीएचडी किंवा समतुल्य पदवी किंवा तीन वर्षांचा संशोधन, अध्यापन आणि डिझाइन आणि विकास या क्षेत्रात अनुभव असणं गरजेचं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमांनुसार एचआरए आणि वैद्यकीय सुविधांसह दरमहा 54,000 रुपये पगार मिळेल. या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा (मुलाखतीच्या तारखेनुसार) कमीत कमी 35 वर्षे आहे. त्याचबरोबर वयाच्या अटीत एससी /एसटी / पीएचसाठी 5 वर्षांपर्यंत आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंतच्या वयात सूट देण्यात आली आहे.

डीआरडीओ भरती 2022

  • पदाचे नाव – डीआरडीओ रिसर्च असोसिएट
  • रिसर्च असोसिएट पदासाठी जाहीर झालेल्या एकूण रिक्त जागा 3 आहेत.
  • फेलोशिपचा कालावधी : 2 वर्षे
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियमांनुसार एचआरए आणि वैद्यकीय सुविधांसह दरमहा 54,000 रुपये पगार मिळेल
  • अधिकृत वेबसाईट-  Click Here

मुलाखतीचे ठिकाण

13 जून, 14 जून आणि 15 जून 2022 रोजी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी डिफेन्स लॅबोरेटरी, रतनदा पॅलेस, जोधपूर-342 011 (राजस्थान) इथे जावं लागेल.

हे सुद्धा वाचा

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता

रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / मटेरियल सायन्स मध्ये पीएचडी किंवा समतुल्य पदवी किंवा तीन वर्षांचा संशोधन, अध्यापन आणि डिझाइन आणि विकास या क्षेत्रात अनुभव असणं गरजेचं

वयाची अट

  • या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा (मुलाखतीच्या तारखेनुसार) कमीत कमी ३५ वर्षे आहे. त्याचबरोबर वयाच्या अटीत एससी /एसटी / पीएचसाठी 5 वर्षांपर्यंत आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंतच्या वयात सूट देण्यात आली आहे.
  • एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मूळ जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

मुलाखतीला कधी कुठे ? कोणती कागदपत्रं आवश्यक ? वाचा

  • पात्र उमेदवाराने “वर नमूद केलेल्या तारखेला 10:00 वाजता डिफेन्स लॅबोरेटरी, रतनाडा पॅलेस, जोधपूर -342 011 (राजस्थान) येथे मुलाखतीसाठी हजर राहावे”.
  • मुलाखतीसाठी उपस्थित असताना, उमेदवारांनी अलीकडील पासपोर्ट फोटोसह संपूर्ण बायो-डेटा आणि सर्व पदवी / शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे / गुणपत्रक / अनुभव प्रमाणपत्र इत्यादींच्या स्वयं-साक्षांकित प्रतींचा एक संच सादर करणे आवश्यक आहे.
    उमेदवारांना वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाशी संबंधित मूळ प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती आहे.
    सरकारी / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / स्वायत्त संस्थांमध्ये काम करणार् या उमेदवारांनी सध्याच्या नियोक्त्याने जारी केलेली एनओसी मुलाखतीला येताना आणावेत.

टीप – इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी कृपया DRDO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.