डीआरडीओमध्ये भरती, परीक्षेशिवाय होणार उमेदवाराची निवड, थेट मुलाखतीमधून…

| Updated on: Sep 23, 2024 | 8:41 PM

Sarkari Naukri 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकप्रकारची सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

डीआरडीओमध्ये भरती, परीक्षेशिवाय होणार उमेदवाराची निवड, थेट मुलाखतीमधून...
Defense Research & Development Organization
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. सरकारी नोकरी करण्याची ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. रिसर्च असोसिएट आणि ज्युनियर रिसर्च फेलो या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

DRDO च्या साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची माहिती देखील मिळेल. या भरती प्रक्रियेतून रिसर्च असोसिएट, केमिस्ट्रीची दोन पदे, जेआरएफ केमिस्ट्रीची तीन पदे, जेआरएफ मेकॅनिकल इंजिनीअरिंगची एक पदे, जेआरएफ बायोटेकचे एक पदे भरले जाणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. 

विशेष म्हणजे उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. वॉक इन मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीला येताना उमेदवारांना कागदपत्रेसोबत आणावी लागतील. मुलाखती 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 

रिसर्च असोसिएट पदासाठी दरमहा 67 हजार रुपये पगार मिळणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी दिल्ली कार्यालयात जावे लागेल. मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. वयाची अटही भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये.