देशाची संरक्षण उत्पादने तयार करण्याची जबाबदारी संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडे (DRDO) आहे. याच कारणामुळे जेव्हा जेव्हा देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांचा विचार केला जातो, तेव्हा तेव्हा डीआरडीओचे नाव सर्वात वर येते. अशा परिस्थितीत या संस्थेसाठी काम करणे ही अभिमानाची बाब आहे. तुम्हालाही या संस्थेत काम करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, डिफेन्स रिसर्च टेक्निकल केडर (Technical Cader) अंतर्गत (डीआरटीसी) विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी डीआरडीओने अधिसूचना जारी केली आहे. डीआरडीओमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (बी) (एसटीए-बी) आणि टेक्निशियन-ए (टेक-ए) या पदांसह एकूण १९०१ डीआरडीओ सीसेप्टम-१० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 3 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती 23 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवार डीआरडीओ drdo.gov.in अधिकृत वेबसाइटवर (Official Website) जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया, पात्रता आणि निवड चाचणीबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. डीआरडीओ भरती सविस्तर सूचना लिंक
निवड प्रक्रिया बहुस्तरीय प्रक्रियेद्वारे केली जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना शॉर्ट लिस्ट केले जाईल आणि सीबीटी मोडमध्ये परीक्षेसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी CEPTAM कडून तयार करण्यात येणार असून, ती लॅब, आस्थापनेमधील संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांना देणार आहे. यानंतर उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. कागदपत्र पडताळणीसारख्या सर्व आवश्यक नियुक्तीपूर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना या कामासाठी त्यांची पदे दिली जातील.
सीनियर टेक्निकल असिस्टंट-बी पदासाठी निवड झालेल्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (सीपीसी) पे मॅट्रिक्स आणि इतर लाभांनुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळेल. टेक्निशियन-ए पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगांतर्गत मासिक वेतन व इतर लागू होणारे लाभ म्हणून १९,९०० ते ६३,२०० रुपये दिले जाणार आहेत.