नवी दिल्ली: मेडिकल क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांना कर्मचारी राज्य बीमा निगम म्हणजेच ईएसआयसी पुणे येथे मेडिकल ऑफिसर पदासाठी संधी आहे. पात्र उमेदवार पुणे येथील कर्मचारी राज्य बीमा निगम कार्यालयात 30 जून रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ईएसआयसीच्या वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन वाचून घ्यावे. या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. (ESIC Medical Officer Recruitment 2021 for post of Medical Officer via Interview)
ईएसआयसीच्या पुणे येथील कार्यालयात 30 जून रोजी मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. पुणे येथील कार्यालयात मुलाखती घेण्यात येतील. मुलाखतीमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जातील.
ईएसआयसीनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार एकूण 35 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येत आहेत.
कर्मचारी राज्य बीमा निगमनं जारी केलेल्या सूचनेनुसार उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीएबीएस उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषा आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
पुण्यातील बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य बीमा निगमच्या कार्यालयामध्ये मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार त्यांच्या प्रमाणपत्रासह मुलाखतीला हजर राहू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या शासन आदेशानुसार ही पद कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार आहेत.
Indian Army Jobs: इंडियन आर्मीमध्ये NCC च्या C सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तरhttps://t.co/ojgQqEHiVL#IndianArmy | #Jobs | #NCC | #SSC
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2021
संबंधित बातम्या:
SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर संधी, 42 हजारांपर्यंत पगार मिळणार
UPSSSC Admit Card : ज्युनिअर असिस्टंट पदासाठीचं अॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड
(ESIC Medical Officer Recruitment 2021 for post of Medical Officer via Interview)