नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC), महाराष्ट्र विभागात मध्ये 10 वी आणि12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसी महाराष्ट्रमध्ये (ESIC Recruitment) 594 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. 594 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत सुरु राहील.कर्मचारी राज्य विमा निगम महाराष्ट्र विभागामध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क , स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ यासह इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण 594 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ विभागीय क्लार्क 318, मल्टी टास्किंग स्टाफ 258 आणि स्टेनोग्राफर 18 इतक्या पदांसाठी भरती होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि पदांची संख्या यासाठी esic.nic.in या वेबसाईटवर भेट देणे आवश्यक आहे.
कर्मचारी राज्य विमा निगमने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबत त्यांना संगणक वापरण्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे. एमटीएस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.
अप्पर डिव्हिजनल क्लार्क पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला 25 हजार 500 ते 81 हजार 110 रुपये वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे. तर स्टेनोग्राफर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 18 हजारे ते 56 हजार 900 रुपये वेतन दिलं जाईल. एससी, एसटी आणि दिव्यांग, महिला उमेदवारांसाठी 250 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. तर, इतर प्रवर्गातील उमदेवारांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय.
स्टेप 1 : सर्वप्रथम ईएसआयसीची वेबसाईट esic.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2: मोबाईल नंबर, ईमेल आयडी नोंदवून अर्जातील माहिती भरा
स्टेप 3 : अर्जातील माहिती जतन करुन पुढील बटनावर क्लिक करा
स्टेप 4 : अर्जाचं शुल्क जमा करा.
स्टेप 5 : कागदपत्रं स्कॅन करुन अपलोड करा
NEET UG counselling : नीट यूजी समुपदेशनाला उद्यापासून सुरुवात, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
ESIC Recruitment 2022 ESIC Maharashtra announced vacancies for 594 posts 12th pass and graduate candidates and ssc pass