ESIC Recruitment 2022: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation,ESIC Recruitment) ने शिक्षक पदांच्या 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे ESIC PGIMSRS आणि ESIC वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges)सहाय्यक प्राध्यापकांची एकूण 491 पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2022 आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अपूर्ण फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत आणि फॉर्म सबमिट करण्यास विलंब झाल्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही. अर्ज (Job Application) करण्यापूर्वी खाली दिलेली महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा.
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीधर असावा. आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे. वयोमर्यादा शिथिलता संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 500 आहे तर SC/ST/PWD/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्जाची फी डिमांड ड्राफ्टद्वारे भरावी.
इथे क्लिक करा ESIC भरती 2022 अधिसूचना
निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश आहे जी मुलखात मंडळाद्वारे घेतली जाईल. ESIC ने ठरवल्यानुसार या पदांसाठी मुलाखत योग्य ठिकाणी घेतली जाईल.
सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-11 अंतर्गत दरमहा रु. 67700 ते रु. 208700 पर्यंत पगार आणि लागू भत्त्यांचा लाभ मिळेल.