Jobs News: ESIC मध्ये रेसिडंट ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे निवड

| Updated on: Jun 30, 2021 | 7:25 PM

मेडिकल क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांना कर्मचारी राज्य बीमा निगम म्हणजेच ईएसआयसी मुंबई येथे रेसिडंट ऑफिसर पदासाठी संधी आहे.

Jobs News: ESIC मध्ये रेसिडंट ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे निवड
ईएसआयसी प्रतािनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: मेडिकल क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांना कर्मचारी राज्य बीमा निगम म्हणजेच ईएसआयसी मुंबई येथे रेसिडंट ऑफिसर पदासाठी संधी आहे. पात्र उमेदवार मुंबई येथील कर्मचारी राज्य बीमा निगम कार्यालयात 15 जुलै रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ईएसआयसीच्या वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन वाचून घ्यावे. या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. (ESIC Resident Officer Recruitment 2021 for post of Resident Officer via Interview)

थेट मुलाखतीद्वारे निवड

ईएसआयसीच्या मुंबई येथील कार्यालयात 15 जुलै रोजी मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. मुंबई येथील कार्यालयात मुलाखती घेण्यात येतील. मुलाखतीमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जातील

पदांची संख्या

ईएसआयसीनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार एकूण 20 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. रेसिडंट ऑफिसर पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदांचा तपशील

एनेस्थिसियोलॉजी-01

जैव रसायन -01

कैजुअल्टी-05

मेडिसीन आणि आयसीयू-03

माइक्रोबायोलॉजी-01

नेत्र शास्त्र (नेत्र) -01

मेडिसीन (छाती)-01

रेडिओ डायग्नोसिस (रेडियोलॉजी)-03

सर्जरी-04

शैक्षणिक पात्रता

कर्मचारी राज्य बीमा निगमनं जारी केलेल्या सूचनेनुसार उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर परीक्षा एम डी, डीएनबी आणि एमबीएबीएस उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषा आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. एबबीस असणाऱ्या उमेदवारांकडे दोन वर्षांचा अनुभव असणं देखील गरजेचं आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच वय 21 ते 35 दरम्यान असणं आवश्यक आहे.

मुलाखत कुठे होणार?

मुंबईतील कर्मचारी राज्य बीमा निगम कार्यालयाचं रुग्णालय कांदिवली, अकुरली रोड, कांदिवली पूर्व, येथील कार्यालायत मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार त्यांच्या प्रमाणपत्रासह मुलाखतीला 15 जुलै रोजी हजर राहू शकतात.

संबंधित बातम्या:

Medical Jobs: ESIC मध्ये मेडिकल ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे निवड

Indian Army Jobs: इंडियन आर्मीमध्ये NCC च्या C सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

(ESIC Resident Officer Recruitment 2021 for post of Resident Officer via Interview)