नवी दिल्ली: भारतीय खाद्य निगम (FCI) ने वॉचमन पदासाठी 860 रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे . ही भरती पंजाब राज्यातील विविध डेपो आणि कार्यालयांसाठी केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज FCI च्या अधिकृत पोर्टल fci-punjab-watch-ward.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 10 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करू शकतात. 860 रिक्त जागांपैकी 345 पदे खुल्या, 86 ईडब्ल्यूएस, 180 ओबीसी आणि 249 एससी श्रेणीसाठी ठेवण्यात आली आहेत.
या भरतीसाठी, अर्जदार शासन मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी किंवा कोणतीही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. पूर्वी ज्यांनी सुरक्षारक्षक म्हणून काम केले आहे, त्यांच्यासाठी पाचवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.
1. अधिकृत वेबसाइट fci-punjab-watch-ward.in ला भेट द्या.
2. नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
3. तुमचा युजर आयडी-पासवर्ड सेव्ह करा आणि अर्ज भरा.
4. फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5. अर्ज शुल्क 250 रुपये भरा आणि अर्जाची प्रिंट आऊट घ्या
अर्जदारांची निवड लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत 120 मल्टीपल चॉईस प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्क, इंग्रजी आणि संख्यात्मक क्षमतेचे प्रश्न असतील. परीक्षेची वेळ मर्यादा 90 मिनिटे असेल. प्रत्येक प्रश्न एका चिन्हाचा असेल आणि कोणत्याही चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. परीक्षेची प्रश्नपत्रिका हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत असेल.
जे उमेदवार शारीरिक चाचणीस पात्र असतील त्यांनाच अंतिम निवडीसाठी बोलावले जाईल. लेखी आणि शारीरिक दोन्ही परीक्षांचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. लेखी परीक्षेत पात्रता गुण 40 टक्के असतील. अपंग अर्जदारांना शारीरिक तपासणीतून सूट देण्यात आली आहे. परीक्षेच्या 15 दिवस आधी प्रवेशपत्र दिले जातील.
इतर बातम्या:
Fci Punjab Watchmen Recruitment 2021 for 860 Vacancies 8th Pass can apply