FSSAI Recruitment 2021 नवी दिल्ली: फूड सेफ्टी अँड स्टँणर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाकडून तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एफएसएसएआयकडून 254 जागांवर अर्ज मागवण्यात आले आहेत. एफएसएसआयकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावे लागतील. अर्ज दाखल करण्यास 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
अर्ज कुठे दाखल करायचा?
एफएसएसएआयकडून तांत्रिक अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागणवण्यात आले आहेत. इच्छूक व पात्र उमेदवार fssai.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करु शकतात.
पात्रता
तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. तर, पदनिहाय शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी एफएसएसआयच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.
फूड अनालिस्ट 4 जागा, तांत्रिक अधिकारी 125 जागा, सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर 37, सहायक व्यवस्थापक 4, सहायक व्यवस्थापक पत्रकारिता जनसंपर्क 2, समाजकार्य 2, सहायक 33, हिंदी भाषांतरकार 1, वैयक्तिक सहायक 19, आयटी सहायक 3 , कनिष्ट सहायक 3
अर्जाचं शुल्क
खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1500 रुपये शुल्क भरावं लागेल. लयाशिवाय एससी, एसटी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्जाचं शउल्क भरावं लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. स्टेट बँकेत या भरतीद्वारे 2056 जागांवर भरती केली जाणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.co.in या वेबसाईटवरील करिअर टॅबमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करावा.
स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदावारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी नोटिफिकेशन जारी केलं आहे.
इतर बातम्या:
Pandora Papers: सचिन तेंडुलकरनंतर अनिल अंबानी, जॅकी श्रॉफ आणि नीरा राडियाही अडचणीत?
FSSAI recruitment 2021 for technical officer and other post check details here