गुगलसारख्या (Google) मोठ्या कंपनीत नोकरी मिळवून हवा करण्याचं सुवर्णसंधी (Golden Opportunity) उपलब्ध आहे. फक्त बातमी सविस्तर वाचून योग्य वेळेत अर्ज भरण्याची गरज आहे. गुगलकडून भारतीय आयटी इंजिनिअर्सला (IT Engineers) मोठी संधी देण्यात आलीये. IT Support इंजिनिअर्सची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. चांगला पगार आणि अर्थातच चांगली प्रोफाईल ही नोकरी तुम्हाला मिळवून देऊ शकते. 2023, 2022,2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. Off Campus Drive साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता,अटी नियम सगळं सविस्तर दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल बद्दलही माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
कुणाला संधी मिळणार – 2023, 2022,2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांना मिळणार संधी
पदाचे नाव – Software Engineer
ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटर्नल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत.
उमेदवाराला इन्फॉर्मेशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे.
तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल.
गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतेही सर्टिफिकेट कोर्स चालणार आहे.
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.