सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, हायकोर्टात नोकरी मिळवण्याची संधी

| Updated on: Jun 09, 2024 | 3:43 PM

HC Jobs 2024 : जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, हायकोर्टात नोकरी मिळवण्याची संधी
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया पटणा उच्च न्यायालयाकडून राबवली जात आहे. patnahighcourt.gov.in या साईटला आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. फक्त हेच नाही तर याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया 80 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करा.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी आणि हिंदी भाषेचे ज्ञान अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक आहे. सहा महिन्यांचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्रही संगणकाचे आवश्यक आहे. कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी.

या भरती प्रक्रियेसाठी 37 वयोगटापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना 550 फीस भरावी लागेल. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवारांनी सर्वात अगोदर व्यवस्थित तपासून घ्यावे, लगेचच करा अर्ज ही मोठी संधी आहे.