हिंगोलीत वैद्यकीय अधिकारी पदावर भरती, 75 ते 85 हजारांपर्यंत पगाराची संधी

| Updated on: Dec 04, 2021 | 7:00 AM

जिल्हा निवड समिती, हिंगोली अतंर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत 7 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

हिंगोलीत वैद्यकीय अधिकारी पदावर भरती, 75 ते 85 हजारांपर्यंत पगाराची संधी
job
Follow us on

हिंगोली : जिल्हा निवड समिती, हिंगोली अतंर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत 7 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकतात. ही पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार असल्यानं उमेदवारांना कायम स्वरुपी नोकरीसाठी दावा करता येणार नाही, असं जिल्हा निवड समिती हिंगोली यांच्याकडून कळवण्यात आलं आहे.

8 डिसेंबरला मुलाखतीचं आयोजन

जिल्हा निवड समिती, हिंगोलीतर्फे आरोग्य विभागात वैद्यकिय अधिकारी गट अ पदाच्या 7 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. वैद्यकीय अधिकारीपदाच्या मुलाखती जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, हिंगोली येथे करण्यात आलं आहे. वैद्यकीय अधिकारी पदावर निवड झालेल्या उमदेवाराला 75 ते 85 हजार रुपयांचं मानधन मिळणार आहे. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा असून संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे.

कंत्राटी तत्त्वावर निवड:

हिंगोली जिल्हा परिषदेकडून वैद्यकीय अधिकारी पदाची निवड कंत्राटी पद्धतीनं करण्यात येणार आहे. उमेदवारांना 11 महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती दिली जाईल. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जाणार असल्यानं त्यांना विमा योजना, वार्षिक वेतनवाढ, भविष्य निर्वाह निधी आणि सेवा ज्येष्ठता नियम लागू असणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असणं आवश्यक आहे. यशिवाय सरकारी आणि खासगी संस्थेतील अनुभव असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

MPSC Update | PSI पदाची शारीरिक चाचणी, मुलाखत लांबणीवर, अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय

सातारा जिल्हा परिषदेत योग शिक्षकांची भरती, 95 जागांसाठी अर्ज करण्याचं आवाहन

MPSC Result | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर

Hingoli District Selection Committee invites application for 7 post of Medical Officer check details here