केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी आपल्या अधिकृत वेबसाईट (Official Website) वर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2ची अधिसूचना जारी केली आहे. या भरती परीक्षेअंतर्गत अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार upsconline.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन (UPSC CDS 2 Application) अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना परीक्षेला बसायचे नाही, त्यांच्यासाठी अर्ज मागे घेण्याची सुविधा यूपीएससीने दिली आहे, हे महत्त्वाचं आहे. अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन (यूपीएससी सीडीएस 2) अर्ज करण्यासाठी उमेदवार अविवाहित असणं आणि तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, इतर नियम आणि अटी यासंदर्भातल्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी जराही वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज 18 मे 2022 पासून सुरु झालाय. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. 14 जून 2022 ते 20 जून 2022 या कालावधीत तुम्ही संध्याकाळी वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज मागे घेऊ शकता. प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख (संभाव्य) 1 ऑगस्ट 2022 आहे. यूपीएससी सीडीएस 2 2022 परीक्षेची तारीख – 4 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in
टीप : अधिक आणि अधिकृत माहितीसाठी कृपया यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.