मुंबई : मुंबईतल्या राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेत नोकऱ्या (Jobs) उपलब्ध आहेत. विविध पदांच्या एकूण 10 रिक्त जागा (Vaccancies) आहेत. पदांसाठी लागणारी पात्रता ही त्या-त्या पदांनुसार असणार आहे. अर्ज (Application) करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 असून उमेदवार ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) किंवा ऑनलाईन (ईमेलद्वारे) पद्धतीने अर्ज करू शकतात. किमान वय 18 आणि कमाल वय 25 असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदांसाठीची निवड परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे. शिकाऊ उमेदवाराच्या पदांसाठीच्या या जागा आहेत त्यामुळे नुकतंच पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला हरकत नाही. बी.कॉम (B.Com), बीए (BA), बी.एससी आयटी (B.Sc IT) आणि सीएस (CS) मध्ये पदवीधर असणारे उमेदवार या राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थे अंतर्गत निघालेल्या जागांवर अर्ज करू शकतात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, पवई, मुंबई – 400087
ईमेल आयडी – nitierecruit@nitie.ac.in
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
एकूण जागा – 10
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम (B.Com), बीए (BA), बी.एससी आयटी (B.Sc IT) आणि सीएस (CS) मध्ये पदवीधर
वयाची अट – 18 ते 25 वर्षांपर्यंत
वेतन – 12000
अर्ज शुल्क – नाही
निवड करण्याची पद्धत – टेस्ट
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन ( ईमेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.edu/
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.